जी.एस.हायस्कूल चे एन सी सी शिक्षक एस.ए.बनछोडे यांनी पूर्ण केले ४५ दिवसांचे प्रशिक्षण
1 min read

जी.एस.हायस्कूल चे एन सी सी शिक्षक एस.ए.बनछोडे यांनी पूर्ण केले ४५ दिवसांचे प्रशिक्षण

Loading

जी.एस.हायस्कूल चे एन सी सी शिक्षक एस.ए.बनछोडे यांनी पूर्ण केले ४५ दिवसांचे प्रशिक्षण

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चे उपशिक्षक व एन सी सी विभागाचे प्रमुख एस.ए.बनछोडे यांनी नागपूर येथे ४५ दिवसांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून असोसीयट एन.सी.सी अधिकारी (ए.एन.ओ) पदाची थर्ड रँक मिळविली.
नागपूर येथील कामठी येथे असलेल्या पी.आर.सी.एन.१८२ जे.डी. अधिकारी प्रशिक्षण अकादमी येथे त्यांनी हे प्रशिक्षण ३ फेब्रुवारी २०२५ ते १९ मार्च २०२५ दरम्यान पूर्ण केले. एन सी सी अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे.संपूर्ण देशातील शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक आणि प्राध्यापक या ठिकाणी एन सी सी अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.
४९ महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमळनेर चे कमांडीग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अमित राय, प्रशासकीय अधिकारी पिनाकी बानिक, ऑफिस सुप्रिटेंडंट सुनील सोनार व विक्रम सूर्यवंशी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी तसेच मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार तसेच खा.शी.मंडळाचे सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *