मराठा सेवा संघ अमळनेरची  बैठक: जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवड आणि रथयात्रेची तयारी
1 min read

मराठा सेवा संघ अमळनेरची बैठक: जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवड आणि रथयात्रेची तयारी

Loading

मराठा सेवा संघ अमळनेरची  बैठक: जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवड आणि रथयात्रेची तयारी

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मराठा सेवा संघ अमळनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या अमळनेर येथील रथयात्रेच्या नियोजनाबाबत विचारविमर्श झाला.
बैठकीत जिजाऊ ब्रिगेडची नूतन कार्यकारिणी निवडण्याबरोबरच, मराठा सेवा संघाच्या तालुका आणि शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यासंबंधी विचार करण्यात आला. तसेच क्रांती पर्व स्मारक समिती गठीत करण्यासंबंधीही चर्चा झाली.
यामध्ये विशेषतः जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी शिवमती वैशाली शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत सचिव नुतन पाटील, कार्याध्यक्ष रेखा पाटील, उपाध्यक्ष सुरेखा खैरनार आणि सिमा पाटील, तसेच कोषाध्यक्ष पुनम ठाकरे यांचा समावेश आहे.
आजच्या बैठकीत आदरणीय प्रा. अशोक पवार यांचा “लोकमत शिलेदार” सन्मान मिळाल्यावर विशेष सत्कार करण्यात आला. नव्या कार्यकारिणीचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले आणि जिजाऊ, राजमाता, तथा जिजाऊ साहेब यांच्या रथयात्रेचे यशस्वी नियोजन करण्याची जबाबदारी मराठा सेवा संघ अमळनेरने स्वीकारली.
सदर बैठकीत प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधराताई लांडगे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष निंबाजी पाटील, कोषाध्यक्ष दयाराम पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, सचिव बापुराव ठाकरे, शहराध्यक्ष डॉ. कुणाल पाटील, प्रेमराज पवार, डॉ. शरद शेवाळे, किरण पाटील, सरपंच महेश पाटील, पी. व्ही. पाटील, दिपक पाटील, प्रा. वंदना पाटील, रेखा पाटील, नुतन पाटील, सुरेखा खैरनार, सिमा पाटील आणि पुनम ठाकरे यासारखे मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ ब्रिगेडच्या नूतन कार्यकारिणीचा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जाहीर सत्कार केला आणि सर्व मान्यवरांनी या नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *