विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला  “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ
1 min read

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ

Loading

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

“विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव आयोजित पारितोषिक वितरण सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी गुणांकडे लक्ष न देता गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले तसेच हप्त्यातून दोन दिवस पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सत्यजित तांबे यांनी संस्थेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त करून संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व या उपक्रमांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी आणि सभासदांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी संस्थेच्या “अर्ज द्या आणि कर्ज घ्या ” या सहज आणि सोप्या कार्यपद्धतीचा उल्लेख करून कौतुक केले. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी एकाग्रता बाळगून अभ्यास करावा व एकाग्रता कशी आवश्यक आहे हे छोट्या छोट्या गोष्टींद्वारे समजावून सांगितले . कार्यक्रमात २२५ विद्यार्थ्यांना १० ग्रॅम चांदीचे नाणे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर अश्वीनी कोळी व डॉ.विलास नारखेडे यांना शासनाचा राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरुड सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र महाजन यांनी केले तर आभार पतपेढीचे मानद सचिव भावेश आहिरराव यांनी मानले

 

 

 

 

 

 

.कार्यक्रमासाठी यु .यु.दादा पाटील , एच जी इंगळे , आर एच बाविस्कर, सी सी वाणी ,साधना लोखंडे, पुष्पा पाटील, सुनील गरुड ,मनोहर सूर्यवंशी, आर आर पाटील ,एस एन पाटील, आदी उपस्थित होते *उपस्थित संचालक* एस्.डी.भिरुड-अध्यक्ष, जे.पी.सपकाळे-उपाध्यक्ष,भावेश अहीरराव-मानद सचिव, भगतसिंग पाटील -खजिनदार संचालक श्रीमती वैशाली महाजन,
संदिप घुगे ,सिध्देश्वर वाघुळदे,तुषार बोरसे
शैलेश राणे रविंद्र चव्हाण ,आबा पाटील, संजय सांगळकर, डिगंबर पाटील ,हेमंत चौधरी
रविंद्र रणदिवे ,सचिन पाटील ,संजय निकम
राजेंद्र महाजन सह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *