माध्यमिक शिक्षक पतपेढी मार्फत रविवारी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.
1 min read

माध्यमिक शिक्षक पतपेढी मार्फत रविवारी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.

Loading

माध्यमिक शिक्षक पतपेढी मार्फत रविवारी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी मर्यादित जळगाव या संस्थेच्या सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या तसेच विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या २२५ गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा व शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कोळी व डॉ.विलास नारखेडे यांचा सत्कार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील* यांचे शुभहस्ते रविवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.निळकंठ गायकवाड भुषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, पदवीधर मतदार सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, विकास पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पतपेढीचे सभासद, सर्व माजी पदाधिकारी व संचालक तसेच मार्गदर्शक संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पतपेढीचे अध्यक्ष एस्.डी.भिरुड, उपाध्यक्ष जे.पी.सपकाळे, मानद सचिव भावेश अहिरराव, खजिनदार भगतसिंग पाटील व सर्व संचालक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *