पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी व धूलिवंदनचे आयोजन
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी व धूलिवंदनचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी: वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे आज होळी आणि धूलिवंदनच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रंगलेल्या सणाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते होळीची पूजा करून करण्यात आले.
संस्थेतील शिक्षिका प्रज्ञा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “होळी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करण्याचा दिवस आहे.” त्यांनी याबरोबर होळीच्या रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरी केली. हा आनंदोत्सव यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, विजय चौधरी, सखाराम पावरा, उमेश पाटील आणि राजेंद्र पाटील यांच्या योगदानामुळे खूपच सुरळीत पार पडला.
कार्यक्रमाच्या धूमधडाकाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे रंग रंगले होते, ज्यामुळे सणाच्या साजशा वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन या खास दिवसभराचा आनंद घेतला.

