अमळनेरमध्ये 2025 ची राष्ट्रीय परिषद: शाश्वत विकास आणि शांतीचा समावेश  समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न
1 min read

अमळनेरमध्ये 2025 ची राष्ट्रीय परिषद: शाश्वत विकास आणि शांतीचा समावेश समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न

Loading

अमळनेरमध्ये 2025 ची राष्ट्रीय परिषद: शाश्वत विकास आणि शांतीचा समावेश

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय परिषद संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 12 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली आहे.
शाश्वत विकास आणि शांती, न्याय, सदभाव या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली .
या परिषदेमध्ये देशभरातून शिक्षण क्षेत्रातून 200हून अधिक प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
मास्वे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य , अमरावती चे प्रा. डॉ.अंबादास मोहिते यांचे बीज भाषण संपन्न झाले
साधन व्यक्ती म्हणून
हैदराबाद येथील डॉ. अबू ओसामा यांची उपस्थिती होती.परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य राजेंद्र नन्नवरे यांचा शुभेच्छा संदेश देण्यात आला. कुलसचिव प्रा डॉ विनोद पाटील,सिनेट सदस्य प, प्रा डॉ धीरज वैष्णव, डॉ कांचन महाजन ,अधिष्ठाता डॉ जगदिश पाटील, प्रा नितीन बारी, आधार संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील, अश्विनी भदाने, राष्ट्र विकास संस्थेचे सचिव तुषार पाटील, डॉ संभाजी देसाई ,श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर चे संस्थापक अध्यक्ष सुभाष भांडारकर, गीत भांडारकर,संचालक डॉ महेश पाटील, अमोल इंद्रसिंग राजपूत,यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन समारंभ अध्यक्ष अभिजीत भांडारकर होते.
हैदराबाद येथील समाजकार्य विषयाचे प्रा डॉ अबू ओसामा यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्राचार्य डॉ लिलाधर पाटील यांनी सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थिती दिली .
प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष सुभाष भांडारकर, संचालक विवेकानंद भांडारकर , डॉ महेश पाटील, अनुरुपा भांडारकर , अनिल वाणी, अनुरूपा भांडारकर,अमोल इंद्रसिंग राजपूत, मासवे चे उपाध्यक्ष डॉ राजेंद्रसिंग दीक्षित प्राचार्य डॉ राकेश चौधरी,डॉ ईश्वर सौंदणकर, डॉ विष्णू गुंजाळ, प्रा डॉ यशवंत महाजन, प्रा डॉ लिलाधर पाटील , डॉ.सुदाम राठोड, प्रा एस डी वळवी मान्यवर उपस्थित होते .

 

 

 

 

 

याप्रसंगी संशोधन पेपर चे सादरीकरण संशोधकांनी केले.

71 संशोधन पेपर जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय परिषद समारोप प्रसंगी सिनेट सदस्य प्रा डॉ संदीप नेरकर, अभिजीत भांडारकर, डॉ. महेश पाटील,डॉ अबू ओसामा हैदराबाद, डॉ महेश पाटील, प्राचार्य डॉ पी एस पाटील,डॉ शाम सोनवणे, डॉ भरत खंडागळे, प्रा विजयकुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय परिषद सर्व सत्र सुरळीत पार पाडण्यासाठी साठी यशस्वी पने सूत्र संचलन प्रा वनश्री बैसाने यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा डॉ भरत खंडागळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय परिषद संचालक म्हणून प्राचार्य डॉ पी एस पाटील, निमंत्रक डॉ भरत खंडागळे, विभाग प्रमुख डॉ जगदिश सोनवणे ग्रंथपाल प्रा उदय महाजन, प्रा डॉ अस्मिता सरवैय्या, प्रा डॉ अनिता खेडकर, डॉ श्वेता वैद्य, प्रा धनराज ढगे,
डॉ.सागर राज चव्हाण यांचेसह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *