शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय…..,  अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी ऐतिहासिक निर्णय- सत्यशोधक विश्वासराव पाटील गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष
1 min read

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय….., अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी ऐतिहासिक निर्णय- सत्यशोधक विश्वासराव पाटील गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष

Loading

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय…..

अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हक्‍कांसाठी ऐतिहासिक निर्णय

-विश्वासराव पाटील
गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गावरानी जागल्या सेना कार्यकारी सदस्य श्री रमेश व्यंकट पाटील, रा. गडखांब यांनी दि. २७ मे २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अंमलबजावणीसाठी मा. सहाय्यक निबंधक, अमळनेर यांनी दि. ०४ जुलै २०२४ रोजी आदेश पारित केला होता.
नंतर, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सततच्या प्रयत्नामुळे, दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी वांधा समितीच्या सदस्यांसह गावरानी जागल्या सेना संघटनेचे अध्यक्ष, तक्रारदार शेतकरी, बाजार समिती सचिव व सहसचिव यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीत खालील निर्णायक निर्णय घेतले गेले:

1. प्लेट काटा तोलाई:-शेतकऱ्यांकडून प्लेट काट्यावरील तोलाईची रक्कम घेतली जाणार नाही, यावर ठाम निर्णय घेण्यात आला आहे.

2. शेतमालाची मोजणी:- शेतमालाच्या मोजणीवेळी ओला शेतमाल, माती व कचरा गोळा असलेल्या शेतमालास कमी भाव देणे किंवा वजन कपातीच्या बाबतीत कोणत्याही बेकायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब न करणे बंधनकारक आहे. शेतमालाच्या लिलावात शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदीदार व्यापाऱ्यास दिलेल्या दरानेच मोजला जाईल.

3. वाढीच्या कपातीच्या बाबतीत निर्णय:-
प्रति क्विंटल ₹४०/- प्रमाणे शेतमाल खरेदीदार व्यापाऱ्याच्या गोडाऊनपर्यंत पोहोच करून देण्यासाठी वाहतूक खर्च म्हणून ₹५०/- आणि अन्य कपात ₹१२७/- रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

4. शेतमाल गोडाऊनपर्यंत पोचवणे:- शेतकऱ्यांना खरेदीदार व्यापाऱ्यांच्या गोडाऊनपर्यंत शेतमाल पोच करण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. मात्र, शेतकरी संमतीनेच गोडाऊनपर्यंत शेतमाल पोच करेल, अशी योजना असेल.

या निर्णयामुळे बाजार समितीच्या वांधा समितीकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची पायरी उचलण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व संचालक मंडळाचे, शेतमाल खरेदीदार व्यापारी व आडतदारांचे तसेच सहाय्यक निबंधकांचे गावरानी जागल्या सेनेच्या तर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
तसेच, शासन स्तरावर जाहीर करण्यात आलेला किमान आधारभूत दर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचा नियमांनुसार F.A.Q. / Non F.A.Q. मूल्यांकनाचे अहवाल बाजार समितीत उपलब्ध प्रयोगशाळेतील प्रतवारीकाराकडून प्राप्त करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्यावरील अन्यायाची बाब कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील सचिव, सहसचिव, उपसचिव यांना सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून वगळलेली सुनावणी मागितली पाहिजे. वांधा समितीने अशा तक्रारींचे निवारण २४ तासांच्या आत करण्यात येईल, अशी आश्वासन दिली आहे.
गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव विठाबाई भास्करराव पाटील यांनी यांनी पत्रकाद्वारे या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्‍कांची जाणीव झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या हक्‍कांचे संरक्षण करण्यास मदत मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *