नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान*
1 min read

नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान*

Loading

*नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान*

 

जळगांव  प्रतिनिधी

 

08 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ जळगाव व तरुण भारत यांचे तर्फे छत्रपती संभाजी नाट्यगृहा मध्ये नारी शक्ती पुरस्कार ऑर्किड नेचर फाउंडेशन च्या सचिव सुनिता महाजन यांना खासदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
सुनिता सोमनाथ महाजन यांचे शिक्षण एम ए बी एड योग शिक्षक पदविका झालेले असून श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल महाबळ कॉलनी जळगाव येथे उपशिक्षिका असून 30 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून लौकिक प्राप्त आहेत त्यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासाठी विविध उपक्रम राबविणे विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवून जीवन जगण्याचे विचार कृतीतून स्पष्ट केले पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासाठी सागर मित्र अभियानात 2015 पासून सक्रिय सहभाग विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन करण्यासाठी कार्य करीत आहेत योग शिक्षिका म्हणून विद्यालयात व शहरातील महिलांसाठी योग वर्ग घेऊन योग प्रचार आणि प्रसार करीत आहेत
त्यांच्या कार्याची दखल समाजाने घेऊन त्यांना पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार 2015 आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार 2015 – 2016 (सामाजिक वनीकरण विभाग जळगाव महाराष्ट्र)
वसुंधरा ग्रीन टीचर पुरस्कार 2017(किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल) दर्या सागर सामाजिक संस्था जळगाव आद्यकवी महर्षी वाल्मिकी आदर्श शिक्षक पुरस्कार 2017
विविध सामाजिक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे
ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव प्रसिद्धी प्रमुख गिरीष रमणलाल भावसार यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *