समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे शाश्वत विकासासाठी शांती,न्याय, सदभाव यावर 12 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*
1 min read

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे शाश्वत विकासासाठी शांती,न्याय, सदभाव यावर 12 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*

Loading

*समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे शाश्वत विकासासाठी शांती,न्याय, सदभाव यावर 12 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*

अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 12 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शाश्वत विकास आणि शांती, न्याय, सदभाव या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेमध्ये देशभरातून शिक्षण क्षेत्रातून 250 हून अधिक प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

मास्वे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य प्रा. डॉ.अंबादास मोहिते यांचे बीज भाषण होणार आहे.

साधन व्यक्ती म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. घनश्याम येळणे तसेच
हैदराबाद येथील डॉ. अबू ओसामा यांची उपस्थिती लाभणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य राजेंद्र नन्नवरे,कुलसचिव प्रा डॉ विनोद पाटील,सिनेट सदस्य प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ धीरज वैष्णव, डॉ कांचन महाजन ,अधिष्ठाता डॉ जगदिश पाटील, प्रा नितीन बारी,श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर चे अध्यक्ष अभिजीत भांडारकर राष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ पी एस पाटील, निमंत्रक प्रा डॉ भरत खंडागळे यांच्या सह प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष सुभाष भांडारकर, संचालक विवेकानंद भांडारकर , डॉ महेश पाटील, अनुरुपा भांडारकर , अनिल वाणी, अमोल इंद्रसिंग राजपूत, मासवे चे महासचिव डॉ संजय फुलकर, प्राचार्य डॉ राकेश चौधरी, डॉ ईश्वर सौंदणकर, डॉ विष्णू गुंजाळ, प्रा उषा वसावे, प्रा डॉ यशवंत महाजन, प्रा डॉ लिलाधर पाटील यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *