ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना- माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील
1 min read

ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना- माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील

Loading

ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना
माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गावातील मूलभूत गरजांच्या आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना असे आवाहन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यानी लोणखुर्द ता.अमळनेर येथे जागतिक महीला दिनानिमित्त ग्रामपंचायत द्वारा आयोजित महीला सभेच्या उदघाटनाप्रसंगी केले.
लोन खुर्द येथे ग्रामपंचायत च्या माध्यमातून आयोजित महिला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती मा. अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, महाराष्ट्र राज्य सरपंच परीषदेच्या विभागीय अध्यक्षा सुषमा देसले, मार्गदर्शिका म्हणून मांडळ प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक्षा पाटील तसेच समुपदेशिका म्हणून गटप्रवर्तक वैशाली ठाकरे होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.तर राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरोग्य आणि स्वच्छतादुत आशाताई अश्विनी भील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन किशोरवयीन मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. अमळनेर येथील एसपी हायजिन प्रा. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील महिलांना तुलनात्मकरित्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामविकासात महिलांची भुमिका ही पुरूषांच्या इतकीच महत्त्वाची असल्याने महिला सभेचा उपक्रम हा माताभगिनिंच्या आरोग्याची दखल घेणारा आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी सौ.सुषमा देसले यांनी केले. आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक्षा पाटील यांनी मासिक पाळी आणि महिलांच्या कर्करोग संबंधित समस्यांवर मार्गदर्शन केले तर किशोरवयीन मुलींच्या समस्यांचा वेध घेत गटप्रवर्तक वैशाली ठाकरे यांनी समुपदेशन केले.
महिला सभेच्या या कौतुकास्पद वागळावेगळे उपक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.
“येत्या काळात महीला सक्षमीकरणासाठी लोणखुर्द ग्रामपंचायत कार्यालय नवोपक्रम राबविण्यासाठी तप्तर असल्याचे मत” अध्यक्षीय मनोगतातून प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी स्पष्ट केले. सुत्रसंचालन हिमानी पाटील यांनी तर आभार भुमिका पाटील यांनी मांडलेत. कार्यक्रमास गावातील माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शिपाई, संगणक परीचालक, आशाताई, कृषी स्वयंसेवक या सर्वानी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *