महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा होणार सन्मान* –
![]()
*महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा होणार सन्मान* –
भुसावल -८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान केला जातो. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा आणि बेटी बचाव बेटी पढ़ाओ, स्त्री जन्माचे स्वागत याअंतर्गत महिलांचा गौरव व्हावा या हेतूने महिलादिनी जन्मलेल्या बालिकांसह त्यांच्या मातापित्यांचा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांच्यातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही सन्मानचिन्ह ,भेटवस्तू शाल खना,नारळाने व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी भुसावळ शहरात आठ मार्च रोजी रात्री बारा ते रात्री बारापर्यंत जन्मलेल्या बालिका यांच्या कुटुंबीयांनी डॉ. प्रदीप साखरे 7 020 35 81 18, पंकज साखरे +917972460572 यांच्याशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.

