हिंगोणे बुद्रुक येथे पहिला सत्यशोधक विवाह संपन्न !..  आप्तेष्टांना सत्यशोधक समाज संघाच्या १०० दिनदर्शिका व महापुरुषांचे २०० ग्रंथ भेट !…  रामकुवर व जाधव कुटुंबीयांची क्रांतिकारी सुरूवात – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
1 min read

हिंगोणे बुद्रुक येथे पहिला सत्यशोधक विवाह संपन्न !.. आप्तेष्टांना सत्यशोधक समाज संघाच्या १०० दिनदर्शिका व महापुरुषांचे २०० ग्रंथ भेट !… रामकुवर व जाधव कुटुंबीयांची क्रांतिकारी सुरूवात – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

Loading

हिंगोणे बुद्रुक येथे पहिला सत्यशोधक विवाह संपन्न !..

आप्तेष्टांना सत्यशोधक समाज संघाच्या १०० दिनदर्शिका व महापुरुषांचे २०० ग्रंथ भेट !…

रामकुवर व जाधव कुटुंबीयांची क्रांतिकारी सुरूवात – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – तालुक्यातील हिंगणे गावातील अंजनी ग्रुप व दुय्यम विद्यामंदिर शाळेत रामकुवर व जाधव कुटुंबीयांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रेरणेने सौ. वंदना व गोकुळ बळीराम पाटील यांचा मुलगा सत्यशोधक प्रंशात व सौ. रेखा व शंकर मुकुंदा माळी यांची कन्या सत्यशोधिका पल्लवी यांचा सत्यशोधक विवाह सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी दि. ९ मार्च, २०२५ रविवार रोजी मोठ्या थाटामाटात लावला.सर्वप्रथम खंडेरायाची तळी भरून विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. वधू-वर, आई-वडील व मामा-मामी यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, संत सावता महाराज, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले, शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक हेमंत माळी, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, व्ही टी माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, प्रा.आकाश बिवाल यासह धरणगांव तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील ज्या ज्या कुटुंबीयांनी सत्यशोधक विवाह लावले यांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. राम कुवर परिवाराच्यावतीने नातलग आप्तेष्टांना सत्यशोधक समाज संघाच्या दिनदर्शिका व महापुरुषांचे २०० ग्रंथ वितरित करण्यात आले.
सत्यशोधक विवाहप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाजाची भूमिका मांडून राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य विशद करून अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा असा संदेश दिला. सत्यशोधक हेमंत माळी व शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालणे ही काळाची गरज आहे व जास्तीत जास्त सत्यशोधक विवाह लावुन भटमुक्त व्हावे असे प्रतिपादन केले. माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी महापुरुषांच्या जीवनावर एक गीत सादर केले. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार सुनिल देशमुख यांनी केले. सत्यशोधक विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *