जागतिक महिला दिनानिमित्त शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नासिक येथे दर्पणकार बाळशास्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला. 9 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता रोटरी क्लब हॉल, गंजमाळ, शालीमार, नाशिक येथे बी.जे. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे सर यांच्या हस्ते अंमळनेर येथील शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने त्यांचे महत्त्व आणखी वाढले. कार्यक्रमात अदिवासी विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोडे, मनपा नासिकच्या आयुक्त मनीषा खत्री, ग्राहक रक्षक समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. जानकी पराग नाईक, उद्योजिका माया निवृत्ती काळे, पूजा राजेश कदम, ऑलम्पिक धावपटू कविता राऊत, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वाती भामरे आणि लोकप्रिय अभिनेत्री नितल शितोळे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा आणि अभिनंदन केले जात आहेत.
शिवमती पुनम बापूराव ठाकरे या अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या उपशिक्षिका, शिवरथ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, पत्रकार आणि मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री बापूराव आनंदराव ठाकरे पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील समर्पणाबद्दल प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपाला डॉ. महेंद्र देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि महिलांच्या महत्वाच्या कार्याची दखल घेण्याची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांचा हा पुरस्कार नव्या पिढीला प्रेरित करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

