काव्य आजचे मी बोलतेय…..
1 min read

काव्य आजचे मी बोलतेय…..

Loading

काव्य आजचे
मी बोलतेय…..

अहो ऐका ना
मी महीला बोलते
तुम्हाला थोडस साचलेल
मनातल सांगावस वाटते…

नका ना खोट
एव्हढ मोठ्ठ बोलू
सगळीकडे माझं
शोषण आहे चालू

पुरुषा तू तर
नाटकी किती वागतो…
आईच्या नावे घर
तिलाच घराबाहेर काडतो…

सारे जर आहेत
भाऊ बहीण
बलात्कार करतय
सांगा ना कोण?

शारीरिक शोषण माझं
आधीकाळापासून होतय
बनवून नटी पुरुषांपुढे
पडद्यावर नाचवल जातय

भर रस्त्यावर माझी
छेड काढली जाते
षंडांची औलाद बघे
मर्दांनगी कुठ दिसते?

कळी जन्मधीच खुडतात
भर.गल्लीत जाळतात
नकार दिला तर
अँसिड अटँक करतात.।

वासनांध डोळे शरीराचे
लचके आमचे तोडतात
स्री धर्म नावावर
उपास तापास करून घेतात

स्री मुक्तीवर बोलण
पुरुषा तुझा छंद
तुझ्या बायकोसाठी
घराच दार बंद…

काय अधिकार त्याला
माझा उदोउदो करयचा
जो नवरा असू नही
संशयच घ्यायचा..।

नका रे महीला
दिन साजरा करू
सगळीकडे महिलांचच
शोषण आहे सुरु

महातारीपासून तर बालिका
बळी पडते अत्याचाराला
कस दिसेल सांगा
पुरुष प्रधान संस्कृती ला

 

प्रकाश पंगु माझी
तू वाचा झाला
महिला दिनी मोकळ
बोलता आल मला..।।

प्रकाश पाटील
यशपंढरी इंग्रजी क्लास अमळनेर
संपर्कासाठी 9665157159

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *