दक्षिण कोरियाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान*-डॉ.दिनेश अमलनेरकर यांचे प्रतिपादन
1 min read

दक्षिण कोरियाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान*-डॉ.दिनेश अमलनेरकर यांचे प्रतिपादन

Loading

*दक्षिण कोरियाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान*-डॉ.दिनेश अमलनेरकर यांचे प्रतिपादन
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यलयात सर्व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी *प्रा.डॉ.दिनेश अमळनेरकर यांचे *”Incredible South Korea: From Poorest to Richest Country through Science and Technology”* या विषयावर दिनांक ४ मार्च २०२५ रोजी दुपारी २:३० ते ४:०० दरम्यान व्याख्यान आयोजित केले होते. प्रा.अमळनेरकर यांनी आपल्या व्याख्यानात दक्षिण कोरिया देशातील लोकांची मानसिकता व तेथील शिक्षणप्रणाली या वर प्रकाश टाकला, तसेच त्या देशाच्या वाईट काळात दक्षिण कोरियाने इतर देशांकडून मदत म्हणून अन्न-धान्य न घेता त्यांच्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी सहकार्य घेतले. यामुळे दक्षिण कोरियाने विज्ञान व तंत्रज्ञानात खुप प्रगती केली. त्यांच्या प्रयोगशील मानसिकतेमुळे जगाच्या पाठीवर प्रख्यात तंत्रज्ञान कंपन्या जसे की, *LG, Hyundai, SAMSUNG , KIA* , अशा असंख्य कंपन्यांचा तो देश मालक आहे, अशी विस्तृतपणे माहिती दिली. मुलांनी संपूर्ण व्याख्यान कुतूहलपणे व जिज्ञासूपणे ऐकले आणि असंख्य प्रश्न विचारले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांचे सरांनी समाधानकारक उत्तरे दिले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष *प्राचार्य डॉ.ए.बी. जैन सर* होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.अमित पाटील उपस्थित होते, सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रमुख वक्त्यांचा परिचय व आभार हे सूक्ष्मजीवशास्र विभागातील प्रा.हेमलता सुर्यवंशी यांनी केले.
प्रा.अमळनेरकर सर हे पुण्यातील नामांकित अशा C-MET ह्या राष्ट्रीय प्रयोशाळेचे Ex-Director होते. ते मूळचे अमळनेरचे असल्यामुळे अमळनेर शहरवरती त्यांचे विशेष असे स्नेह व आस्था आहे. प्रस्तुत कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व पदवी व पदव्युत्तर वर्गातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.अमळनेर सर दक्षिण कोरियातील नामांकित अशा तीन विद्यापिठातील अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी कोरियातील त्यांचा प्रत्यक्ष अनुभव पीपीटीद्वारे सादर केल्यामुळे विद्यार्थ्यांना ते थेट पोहचले, असे व्याख्यानातून स्पष्टपणे जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *