“अमळनेरमध्ये कागदी कपांवर बंदी: आरोग्याच्या दिशेने नपाचे महत्त्वपूर्ण पाऊल!”
![]()
“अमळनेरमध्ये कागदी कपांवर बंदी: आरोग्याच्या दिशेने नपाचे महत्त्वपूर्ण पाऊल!”
अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, संस्था आणि कार्यालये यांना महत्वपूर्ण माहिती! जिल्हाधिकारी कार्यालय जळगावने दिनांक 4 मार्च 2025 रोजी कॅन्सर सारख्या गंभीर आजारांमुळे धोकादायक ठरणाऱ्या चहा आणि कॉफीच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
या निर्णयांमुळे, सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की, चहा किंवा कॉफीसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी कपांचा वापर करणे कठोरपणे मनाई आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, त्यामुळे सर्वांनी या आदेशाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी घेतला गेला आहे, आणि यामुळे कॅन्सरच्या जोखमींना कमी करण्यात मदत होईल.
सर्व नागरिकांनी व संबंधित संस्थांनी या नियमांचे गांभीर्याने पालन करून आरोग्यदायी समाजनिर्मितीत योगदान देणे अपेक्षित आहे.
मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांनी केले आहे.

