“मानव विकास मिशनचा उपक्रम: कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलींचे वितरण!”
![]()
“मानव विकास मिशनचा उपक्रम: कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात मोफत सायकलींचे वितरण!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
“मानव विकास मिशन तर्फे मोफत सायकल वाटप ” कै.बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवेल
विद्यालयात मानव विकास मिशन योजनेमधून अंतर्गत इयत्ता 8 वी ते 10वी च्या विद्यार्थिनींना एकूण 15 सायकली मंजूर करण्यात आलेले होत्या . त्यांची आज दिनांक 4- 3- 2025 मंगळवार रोजी सायकलींचे वाटप करण्यात आले . या प्रसंगी विद्यार्थिनी व पालक वर्ग उपस्थित होता . सायकली वाटप करण्यासाठी पालक वर्गांना आमंत्रित करण्यात आले होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.रमेश सखाराम गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमान नानासाहेब तुकाराम बळीराम माळी ‘ संस्थेचे सचिव श्रीमान आप्पासाहेब एकनाथ बळीराम माळी ‘ शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश तुकाराम माळी उपस्थित होते . यात महिला पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .यात सौ.रेखा सुरेश देसाई, सौ.मनीषा शाम जव्हेरी,सौ नंदा शरद कोरे, सौ.सुमित्रा किरण ठाकरे सौ. मीनाक्षी पंडित खैरनार सौ. मनीषा शाम जव्हेरी उपस्थित होत्या . तसेच पुरूष वर्गात श्री. छगन रजसिंग गावित श्री. पंडित जानू बहिरम नवापाडा. किरण तुळशीराम ठाकरे नवापाडा श्री. अनिल चिंतामण पवार झिरणीपाडा श्री. कल्पेश हाभ्या सोनवणे झिरणी पाडा. श्री. शरदजी भाऊ कोरे. श्रीमती. मीरा गणू पवार नागझिरी श्री. गणेश रामदास सूर्यवंशी नागझिरी.श्री. अशोक गोरख देसाई भोरटीपाडा गावातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते . सायकली वाटप केल्यानंतर पालक वर्गात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. एक समाधानाची बाब म्हणून सौ.नंदा शरद कोरे यांनी आपले मनोगत मुख्याध्यापकांचे आभार मानले .व विद्यार्थिनींना सूचना केल्या .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी सभेचे प्रास्ताविक केले . मानव मिशन विकास योजना अंतर्गत मोफत मिळालेल्या सायकली यांचा वापर करावा .शाळेवर येताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे . वाहतुकीचे नियमांचे पालन करावे .वाहतुकीचे नियम यावेळी विशद केले .सर्व विद्यार्थिनींनी त्या नियमांचे पालन करावे .असे सुचविण्यात आले . याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता एक आनंदमय वातावरण विद्यालयात अनुभवास आले. विशेषता विद्यार्थिनींना आनंदाचा पारावर राहिला नाही .आणि मानव विकास मिशन योजनेचे व शासनाचे मनापासून आभार व कौतुक करताना पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थीनी दिसल्या .

