शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक.,
1 min read

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक.,

Loading

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक.

अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात;
गोळ्या देणाऱ्या डॉक्टरला अटक –
एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यातून ती गर्भवती राहिली. नंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. तर गोळ्या देणाऱ्या डॉक्टरला अटक.

गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टाराला अटक

ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी) : शेजारी राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित व्यक्तीनं जेवणाच्या बहाण्यानं स्वतःच्या घरात बोलून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. या घटनेमुळं अल्पवयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती राहिली. यावेळी आरोपीची पत्नी, आई आणि सासू यांनी गर्भपाताचा कट रचला होता. याप्रकरणी उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्यानुसार २९ वर्षीय आरोपीसह चार महिलांना पोलिसांनी अटक केली. तर पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तपासात उघड झालं आहे.

डॉक्टरला अटक केली : या प्रकरणी गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरला रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली. डॉ. राजकुमार सिंग (वय ५४) असं अटक आरोपी डॉक्टरचं नाव आहे. तर पीडित मुलगी राहत असलेल्या भागातच आरोपी डॉक्टरचं क्लिनिक आहे. डॉ. सिंग याला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

*मुख्य आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी :* मुख्य आरोपीला पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. तर रविवारी पोलीस कस्टडी संपल्यावर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं असता, दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

*अशी घडली आहे घटना :*
पीडित १७ वर्षीय मुलगी ही उल्हासनगर शहरात कुटुंबासह राहात असून तिच्या शेजारीच २९ वर्षीय आरोपी हा पत्नी आणि मुलासह राहतो. त्यातच जुलै 2024 मध्ये आरोपीची पत्नी, मुलं आणि आई-वडील त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यामुळं तो एकटा असताना दुपारच्या जेवणाच्या बहाण्यानं त्यानं शेजारी राहणाऱ्या पीडित मुलीला घरात बोलावलं. त्यानंतर त्यानं तिच्यावर दोन तीन वेळा बलात्कार केला आणि या घटनेची कुठं वाचता केली तर ठार मारण्याची तिला धमकी दिल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

*गर्भपात घडवून आणण्याचा रचला कट* : पोलिसांनी सांगितलं, “फिर्यादीनं तिच्या तक्रारीत नमूद केलं की ती गरोदर राहिली पण चार महिने उलटले तरी तिला ते कळलं नाही. एकदा तिला गर्भधारणा झाल्याचं समजल्यानंतर तिने आरोपीला माहिती दिली. आरोपीनं तिला गर्भपात करण्यासाठी काही गोळ्या दिल्या, पण गर्भपात झाला नाही. अखेर फेब्रुवारीमध्ये, आरोपीची पत्नी, आई आणि सासूनं या पीडित मुलीचा गर्भपात घडवून आणण्याचा कट रचला. त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडील गावी गेले होते. त्यातच पीडित मुलीला वेदना होऊ लागल्या. त्यामुळं रुग्णालयात नेऊन आरोपींनी पीडित मुलीची बनावट ओळख आणि त्यावर चुकीचं वय दिलं. त्यानंतर डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला दिला”.

*मृत गर्भ जमिनीत पुरलं* : अखेर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात बनावट कागदपत्रं सादर करून पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर तिचा मृत गर्भ आरोपीची पत्नी आणि आईनं लगेचच एका ठिकाणी जमिनीत पुरला. दरम्यान ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. जेव्हा पीडित मुलीची आई गावावरून परत आली त्यावेळी मुलीनं घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर या घटनेचं बिंग फुटलं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *