विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन
![]()
विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
28 फेब्रुवारी, विज्ञान दिनाचे औचित्य साधून वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या असाधारण आयोजनाने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन भरले. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक प्रयोग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये Salt Water Experiment (पाणी + मिठ प्रयोग), Sugar Water Rainbow Experiment (साखर + पाणी इंद्रधनुष्य प्रयोग), Day Night Model (दिवस-रात्र वर्किंग मॉडेल) आणि Water Purification Model (पाणी शुद्धीकरण प्रयोग) यांसारख्या अद्वितीय प्रकल्पांचा समावेश होता.
पालक व नातेवाईकांनी आपल्या मुलांचे प्रोजेक्ट बघण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीत प्रज्ञा पाटील मॅडम, कुंजल पाटील मॅडम, मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोणकंथी मॅडम, विजय चौधरी तसेच ITI च्या प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील , समाधान शिरसाठ , सखाराम पावरा, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या गूढ जगात अधिक प्रवेश मिळाला आणि त्यांच्यात विज्ञानाची आवड वर्धित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.




