समाज कार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा हिमाचल प्रदेश व पंजाब राज्य अभ्यास दौरा
1 min read

समाज कार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा हिमाचल प्रदेश व पंजाब राज्य अभ्यास दौरा

Loading

समाज कार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा हिमाचल प्रदेश व पंजाब राज्य अभ्यास दौरा
अमळनेर
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे समाजकार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यात करण्यात आला. हिमाचल प्रदेशातील शिमला ,मनाली ,धर्मशाळा महत्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील कार्यरत विविध संस्था व ऐतिहासिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.
शिमला येथे हिमालय नेचर पार्क कुफरी,हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट तसेच इतर प्रेक्षणीय स्थळे ,मॉल रोड येथे भेटी देण्यात आल्या.
कुल्लू येथे शाल फॅक्टरी रिव्हर राफ्टिंग तर मनाली येथे प्राचीन हिडींबा देवी टेम्पल येथे भेट देऊन हिमाचली पारंपारिक पोशाखात चित्र काढून आनंद घेतला .येथे तिबेटियन मोनेस्ट्री व मॉल रोड येथे भेट देण्यात आली धर्मशाळा येथे वार मेमोरियल, सुप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम नोर्बुलिंग इन्स्टिट्यूट ,जागोरी संस्था ,दलाई लामा टेम्पल येथे भेटी देण्यात आले
पंजाब येथील वाघा बॉर्डर या भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा सीमा सुरक्षा दल परेडला उपस्थिती देऊन देशभक्तीपर रोमांचकारी अनुभव घेतला. अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर येथे भेट देऊन लंगर प्रसादाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला . जालियनवाला बाग या ऐतिहासिक स्मारकास भेट दिली. असा एकूण 11 दिवसांचा अभ्यास दौरा अतिशय
व्यवस्थितपणे अविस्मरणीय आठवणीने पार पडला .
अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांनी मार्गदर्शन केले तर अभ्यास दौऱ्यात समन्वयक प्रा विजयकुमार वाघमारे आणि
प्रा डॉ सागर राज चव्हाण यांच्यासह एकूण 50 विद्यार्थ्यांनी या अभ्यास द्या आपला सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *