मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
![]()
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
माझी मराठी मराठी
कार्य वर्णू तिची बात
सुखदुःख सांगायला
कमी पडते सारी रात//१//
माझी मराठी मराठी
अमृतातेही जिंके पैजा
सासुसूना ही म्हणती
एकमेका बहीण बायजा//२//
माझी मराठी मराठी
हिला कस्तुरीचा वास
नुसत्या गद्यानेही होई
भजन कीर्तनाचा भास/३//
माझी मराठी ,अहिराणी
दुग्ध शर्करा हा योग
दोन प्रेमळ शब्दांनी
दूर जाती सारे रोग//४//
मराठीचा गौरव दिन
27 फेब्रुवारी
माझ्या भाषेचे महत्त्व
साऱ्या जगात आहे भारी//५//
वाक्यप्रचार आणि म्हणी
जोडशब्द न सुविचार
बोलताना मनात येतील
सात्विक सुंदर विचार//६//
माझी मराठी मराठी
अलंकारांनी सजली
संधी अन समासाने
मनामनात रुजली//७//
माझी मराठी माऊली
शब्दगणिक सुरताल
स्वभाषेतील शिक्षणाने
ज्ञान टिके चिरकाल//८//
सौ रेखा वाल्मिक मराठे
जि प शिक्षिका अमळनेर
जि जळगांव
9421164552



