डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन
![]()
डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन
अमळनेर प्रतिनिधी
बिलासपुर (छत्तीसगड) येथिल जे.पी .वर्मा पदव्युत्तर महाविद्यालयात एक दिवसाच्या राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन केले गेले होते. सुप्रसिद्ध व्यंग्यकार हरिशंकर परसाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त हा कार्यक्रम होता .
विषय विशेषज्ञ आणि बीज भाषक म्हणून प्रो डॉ सुरेश माहेश्वरी ,प्रो डॉ रामगोपालसिंह जादौन, वरिष्ठ प्रोफेसर हिंदी ,गुजरात विद्यापीठ ,अहमदाबाद, डॉ विनय कुमार पाठक, माजी अध्यक्ष , राजभाषा आयोग छ. ग, राज्य , राज्य मंत्री दर्जा, माजी न्यायमूर्ति श्री चंद्रभूषण बाजपेयी(मान उच्च न्यायालय ,छ. ग.) अतिथी म्हणून निमंत्रित होते .
सदरहू कार्यक्रमाचे अध्यक्ष मान प्राचार्य डॉ श्यामलाल निराला हे होते.
या प्रसंगी डॉ मीतू बरसैया यांनी पीएच .डी. पदवी साठी केलेले संशोधन ग्रंथ ‘हिन्दी व्यंग्यालोचन को डॉ सुरेश माहेश्वरी का प्रदेय’ चे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे प्रकाशक पंकज बुक्स दिल्ली आहेत .
अशा प्रकार चे संशोधन अमळनेरातील समीक्षाकांवर पहिल्यांदाच झाले आहे.

डॉ पाठकजी यांच्या मते व्यंग्य समीक्षेचे प्रवर्तक सिद्ध करणारे हे काम आहे. डॉ सिंह यांचे म्हणणे हे होते की, सैद्धांतिक समीक्षे ची मानकें निर्माण करणारे हे काम आहे.

