श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा!
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा!
अमळनेर प्रतिनिधी
येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या तर्फे संचालित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजेसाठी तयारी जोरात आहे.
दुपारी एक ते सहा या वेळात मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचा उपस्थीत राहून महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी तीन वाजता महाआरती आणि तीर्थ महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
या महापूजेसाठी मंदिरातील सभा मंडपात कैलास पर्वताची आकर्षक आरास व सजावट करण्यात आलेली आहे. मंगळवारचा भोम प्रदोष व बुधवारची महाशिवरात्री यामुळे मंदिरातील श्री मंगळदेव ग्रहाच्या मूर्तीला श्री महादेवाचे रूपात सजविण्यात आले आहे.
मंदिर परिसरही भव्य सजावट करण्यात आलेली आहे, ज्यामुळे भाविकांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव मिळेल. मंगळ ग्रह सेवा संस्थेने भाविकांना तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या खास दिवशी सर्व श्रद्धाळू भक्तांचे स्वागत केले जाईल!

