सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस निबंध स्पर्धाच्या माध्यमातून साजरा !!!
1 min read

सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस निबंध स्पर्धाच्या माध्यमातून साजरा !!!

Loading

सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस निबंध स्पर्धाच्या माध्यमातून साजरा !!!

 

अमळनेर प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशनचे प्रमुख माननीय सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस अमळनेरच्या औषधी विक्रेता संघ यांच्या वतीने साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे पाचवी ते सातवी व आठवी ते बारावी या दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यात 106 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.अगदी अभ्यासपूर्ण अशा निबंध मधून प्रत्येकी गटामधून तीन व दोन उत्तेजनार्थ अशा प्रत्येकी गटामधून पाच विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे
अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघ यांच्या वतीने
देण्यात आली. व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत पाटील, उपाध्यक्ष श्री निलेश पाटील, सचिव श्री प्रवीण माळी,जिल्हा कार्यकारणी सदस्य व शारदा मध्यामिक विद्यालयाचे संचालक मा.श्री सुनील भाऊ छाजेड,माननीय श्री मुरलीधर चौधरी,मा.श्री रामचंद्र पाटील,माननीय श्री प्रभाकर पाटील, गांधाली गावाचे सरपंच श्री नरेंद्र पाटील व शारदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी डी जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्रशांत पाटील यांनी भूषवले.सर्वप्रथम विद्येची देवता शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.डी.डी.जधव सरांनी मेडिकल असोसिएशनचे कार्य विशद केले. यानंतर निबंध स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली.शाळेचे उपशिक्षक श्री एस एच भवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्ष भाषण झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार
श्री विकास महाजन यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचलन श्री आर .जी. राठोड यानी केले.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य छाजेड मेडिकल यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *