मुख्याध्यापक श्री.महादेव क्षीरसागर यांची आज शासकीय सेवानिवृत्ती…..  छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण पूर्व शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. महादेव क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या जीवनपट उलगडण्याच्या छोटासा प्रयत्न.  *संकलन: मनिलाल शिंपी*
1 min read

मुख्याध्यापक श्री.महादेव क्षीरसागर यांची आज शासकीय सेवानिवृत्ती….. छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण पूर्व शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. महादेव क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या जीवनपट उलगडण्याच्या छोटासा प्रयत्न. *संकलन: मनिलाल शिंपी*

Loading

मुख्याध्यापक श्री.महादेव क्षीरसागर यांची आज शासकीय सेवानिवृत्ती…..

छत्रपती शिक्षण मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण पूर्व शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. महादेव क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या जीवनपट उलगडण्याच्या छोटासा प्रयत्न.

*संकलन: मनिलाल शिंपी*

शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान करणारा व्यक्ती नसून तो समाजाच्या शिल्पकार असतो त्याच्या हातून पेरलेल्या ज्ञानाच्या बीजांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा प्राप्त होते. नवनव्या वाटा , चोखंदळ वृत्तीने विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे एक दिव्य व्यक्तिमत्व 25 फेब्रुवारी 1967 रोजी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबात महादेव सिद्धराम शिरसागर या नावाने जन्माला आले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महादेव क्षीरसागर यांचे बालपण अत्यंत कष्ट व संघर्षमय गेले.शेतीच्या कामात हातभार लावून शिक्षण घेण्याच्या ध्यास घेत घरातील परिस्थितीत काबाड कष्ट करत त्यांनी शैक्षणिक प्रवास आवडीने सुरू ठेवला.
पहिली ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण करून माध्यमिक शिक्षण मोठी बहीण व मेव्हणे यांच्या सहकार्याने कल्याण येथील ज्ञान मंदिर हायस्कूल मध्ये नववी दहावीचे शिक्षण घेत बहीण मेव्हण्यांनी घेतलेली जबाबदारीची जाण ठेवून माध्यमिक शाळांच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले. पुढील शिक्षणासाठी धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे अकरावी व बारावी तसेच त्याच महाविद्यालयातून बीएची पदवी संपादन केली. याच दरम्यान एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये सक्रिय सहभागी घेतला. घरातील परिस्थितीची जाणीव ठेवत 1985 ते 1987 कमवा शिका या योजनेत सक्रिय सहभाग घेतला. शालेय व महाविद्यालयीन जीवनात महादेव क्षीरसागर यांनी खेळाडू म्हणून क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले .कबड्डी या खेळाच्या माध्यमातून महादेव क्षीरसागर यांची मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि धाराशिव येथे जिल्हास्तरावर निवड झाली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून बीपीएड शारीरिक शिक्षक शिक्षण विभागातील पदवी संपादन केली. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामधून मास्टर डिग्री संपादन केली व मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन देखील पूर्ण केले. बालपणापासूनच खेळाशी नाळ जोडलेली असल्यामुळे महादेव क्षीरसागर यांनी क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक पदवी संपादन केली. याचे दरम्यान 1987 मध्ये महाराष्ट्र राज्य स्तरीय कबड्डी अजिंक्य स्पर्धेसाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग येथून त्यांची निवड झाली व 1988 मध्ये मल्लखांब खेळात शिवाजी विद्यापीठातून विद्यापीठ खेळाडू म्हणून सांगली येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. आणि शिवाजी चरिस्टरावरी कबड्डी खेळाडू म्हणून आजरा महाविद्यालय आजरा सावंतवाडी येथूनही स्पर्धेत सहभाग घेतला.
महादेव क्षीरसागर यांनी आपल्या तीन दशकाहून अधिक कालावधी शैक्षणिक कारकिर्दीत विविध शाळा व महाविद्यालय तसेच सामाजिक व क्रीडा संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ आणि विस्तार स्वर्गीय त्र्यंबक फणसे यांच्या प्रेरणेने नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण पश्चिम येथे 2008 मध्ये विजयादशमीच्या दिवशी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या उपक्रमाने आर्चरी खेळाच्या प्रचार आणि प्रसार हो ण्यास मोठी चालना मिळाली यातून प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या खेळाडूंनी ठाणे जिल्ह्यातील आर्चरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. महादेव क्षीरसागर यांच्या अथक प्रयत्नांमुळे फिल्ड आर्चरी ठाणे जिल्हा सचिव म्हणून ते कार्यरत राहिले असून ठाणे जिल्हा आर्चरी सचिव पदावर राहून या खेळाच्या प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक युवकांना आर्चरी प्रशिक्षण देण्याची उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
श्री. महादेव क्षीरसागर यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय व अभिमानास्पद कामगिरी केली आहे ती माजी आमदार नरेंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने दहा हजार विद्यार्थ्यांचे एकत्र सूर्यनमस्कार अनुष्ठान सुभाष मैदान संपन्न केले.
ठाणे जिल्हा सूर्यनमस्कार संघटनेचे अध्यक्ष मा. आमदार नरेंद्र पवार यांच्या या संघटनेमध्ये सचिव म्हणून महादेव क्षीरसागर कार्यरत आहेत. तसेच धनुर्विद्या मुख्यमंत्री चषक स्पर्धा देखील यशस्वीपणे संपन्न केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील असोसिएशनचे अध्यक्ष मा. सुनीलजी वायले यांच्या सह फिल्ड आर्चरी संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. ठाणे जिल्हा आटपाट्या असोसिएशनचे अध्यक्ष मा. आमदार ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. ठाणे जिल्हा धनुर्विद्या असोशियन चे अध्यक्ष प्रा. उदय नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सचिव पद सांभाळत आहेत. 1 ऑगस्ट 1999 ते 30 जून 2002 या कालावधीत जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई, तालुका मुरबाड येथे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केले. याच काळात आर एस एस प्राथमिक वर्ग भिवंडी येथे जबाबदारी पार पाडले आणि मुरबाड प्रवास प्रचारक श्री. मिलिंद मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याने शिक्षण क्षेत्रातील वाटचाल पुढे सुरू ऑगस्ट 2002 ते 15 जून 2010 या कालावधीत नूतन विद्यालय कर्मीक्र रोड कल्याण पश्चिम येथे सेवा करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी उल्हासनगर पश्चिम येथे जबाबदारी सांभाळली.1 जानेवारी 2021 ते 2023 या कालावधी जनता विद्यामंदिर दहिवली जिल्हा रायगड येथे मुख्याध्यापक पदावर पदोन्नती म्हणून कार्यभार सांभाळला. जनता विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करून आणल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आणि शाळेला नवीन आयाम दिला. फेब्रुवारी 2023 पासून ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या नेतृत्वगुणांच्या लाभ संस्थेला मोठ्या प्रमाणात होत असून विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा देणारे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.
असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा समितीवर क्रीडा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत व 49 शालेय खेळाचे आयोजन नियोजन करण्यामध्ये महादेव क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा आहे. क्रीडांगणावर खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक यांना कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये किंवा स्पर्धा चांगल्या यशस्वी होण्यासाठी योग्य समन्वय आपल्या स्मित आणि मधुर वाणीने समजून घेत सर्वांमध्ये एकोपा घडण्याचे काम महादेव क्षीरसागर हे नेहमीच करत आहेत. स्पर्धा कोणतीही असो नेहमी आपल्या सहकारी शिक्षक विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी महादेव क्षीरसागर नेहमी पाठीशी उभे राहतात असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व शासकीय नियमानुसार जरी निवृत्त होत असले तरी ते पुढील काळात ढाल होऊन क्रीडा क्षेत्राशी, क्रीडा शिक्षकांचे, खेळाडूंचे तसेच क्रीडा प्रेमींचे आधारस्थान राहतील व कायम मार्गदर्शक म्हणून प्रेरणा देत राहतील .त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व आनंदमय जावो अशी लेखाद्वारे मी त्यांना शुभेच्छा देत आहे. कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ अध्यक्ष प्रा. लक्ष्मण इंगळे, फिल्ड आर्चरी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रा.उदय नाईक, जिल्हा संघटक अविनाश ओंबासे, तसेच सोलापूर क्रीडा अधिकारी डॉ. भूषण जाधव साहेब यांच्याकडून श्री महादेव क्षीरसागर सरांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *