हिंदी भारत की भाषा है*- *डॉ.संदीप सपकाळे यांचे प्रतिपादन*
![]()
*हिंदी भारत की भाषा है*-
*डॉ.संदीप सपकाळे यांचे प्रतिपादन*
————————————————
● प्रतापीय अंकाचे प्रकाशन
● हिंदी विभाग एवं करिअर कौंसेलिंग
सेंटर चा उपक्रम
● राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे
सहकार्य
● महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विश्व
विद्यालय,वर्धा आणि प्रताप कॉलेज
यांच्यात होणार सामंजस्य करार
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील हिंदी विभाग आणि करिअर कौन्सिल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी ११.३० ते १.३० वाजे दरम्यान महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय,वर्धा येथील मराठी विभाग प्रमुख तथा हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ.संदीप सपकाळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील प्रतापीय अंकाचे(२०२० ते २०२३)प्रकाशन सुद्धा प्रमुख अतिथी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष व्याख्यान आणि प्रतापीय अंकाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते.यावेळी व्यासपीठावर हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.शशिकांत सोनवणे ‘सावन’ , करियर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे रुसा व आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, डॉ.व्ही बी मांटे, डॉ.कल्पना पाटील,परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी हे यावेळी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सभागृहात प्रा.नितेश कोचे,डॉ. रमेश माने,डॉ. विलास गावित,डॉ.के.जी. कुमावत, डॉ. माधव भुसनर,प्रा.शालिनी व्यास,डॉ.सुनिल राजपूत, प्रा.येवले उमेश, ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.कैलास बागुल,पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा.संदीप नेरकर,प्रा उन्मेष जाधव ,प्रा दिलीप तडवी,आदी उपस्थित होते.


प्रस्तुत समारंभात विशेष मार्गदर्शक व अतिथी डॉ.संदीप सपकाळे यांनी यावेळी हिंदी विषयाचे महत्त्व व समकालीन प्रासंगिकता या संदर्भात आपले मत व्यक्त करताना असे म्हणाले की, हिंदी आपली भाषा आहे,हिंदी ही भाषा सर्व समूहाला एकत्रित करण्याचे कार्य करते.महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर यांच्या विचारात मतभिन्नता असली तरी ते दोघे हिंदी विषयाचे प्रशंसक होते.त्यामुळे हिंदी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि रोजगार निर्मितीच्या संदर्भात उपयुक्त स्वरूपाचा आहे.
अलीकडे शैक्षणिक विश्वात हिंदी ही भाषा अति जलद पद्धतीने विकसित होत आहे म्हणून विविध केंद्रीय विश्वविद्यालयात हिंदीचे अध्ययन, अध्यापन व संशोधन यावर विशेष स्वरूपात भर देण्यात येत आहे. भारताची ज्ञान परंपरा ही प्राचीन सभ्यताने जोडलेली आहे, यामध्ये भाषा अंतर्गत संशोधन होणे आजच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे आहे म्हणून भारतीय साहित्य सर्व अवधारणांना विकसित करते.या स्वरूपात आपली भूमिका व मत डॉ.संदीप सपकाळे यांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.ए बी जैन म्हणाले की,हिंदी विषयात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे, त्यांनी यावेळी सर्वांना विश्व भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी स्वागत गीत हिंदी विभागातील विद्यार्थिनी यांनी म्हटले.प्रथमतः पूज्य साने गुरुजी,श्रीमंत-दानशूर प्रताप शेठजी,माता सरस्वती देवी यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत समारंभाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.शशिकांत सोनवणे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक व अतिथींचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी करून दिले. त्याचबरोबर प्रस्तुत समारंभाचे सूत्रसंचालन हिंदी विभागातील डॉ.रूपाली चौधरी यांनी केले तर आभार प्रा.कैलास बागुल यांनी मानले.प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागातील प्राध्यापक,विद्यार्थी,करिअर कौंसेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,अतुल राजपूत,अनिकेतन अहिरे,अक्षय सोनार,कार्यालयातील जयदेव पाटील,विजय जाधव,दिपक चौधरी,योगेश चौधरी,ग्रंथालयातील कर्मचारी शुक्ला,नितीन सोनार,राजू बिऱ्हाडे,आदींनी सहकार्य केले.याचप्रमाणे अंबादास चावरिया,होस्टेलचे मुश्ताक,पठाण तसेच सुरक्षा रक्षक यांनी देखील सहकार्य केले
कार्यक्रमाचे समारोप राज्यशास्त्र विभागातील डॉ.हर्ष नेतकर यांनी व्हायोलिन द्वारे राष्ट्रगीताने केले.

