“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
![]()
“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण
अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
अमळनेर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध शिवगीते, पोवाडे अन इतर गीतांच्या माध्यमातून “शिव पहाट” हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. येथील मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त शिवरायांच्या शौर्यगाथा सर्वांसमोर प्रगट करता आले. येथील जिजाऊ प्रवेश द्वारा जवळ झालेल्या कार्यक्रमात शिवप्रेमी मंत्रमुग्ध झाले.
गायक कैलास पाटील, इंजी.उज्वल पाटील व वसुंधरा लांडगे यांनी विविध शिव गिते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना व शिवरायांचा पाळण सादर केला. कैलास पाटील यांनी दोनच राजे इथे जन्मले कोकण पूण्य भुमीवर….एक रायगडावर…एक चवदार तळ्यावर… , मराठा सेवा संघ काम एकीचं करणार… आम्ही घासुन ठेवली या लेखणीची तलवार..
माझी जिजाऊ ची पुण्याई अशी आली हो फळाला तो बापाचा बाप शिवबा जन्माला.. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती ही प्रबोधनपर शिवगितांचे सादरीकरण केले. इंजी.उज्वल पाटील यांनी तु चाल रं पुढं भिती कुणाची तसेच शेतकरी गीत गायले. त्यांना संगीत साथ ढोलकी वादक मैलागीर व रविंद्र पाटील यांनी दिली. शेवटी उपस्थित शिवप्रेमींना शिव प्रतिज्ञा देण्यात आली. सुरुवातीला माता जिजाऊ छत्रपती शिवराय तसेच बळीराजा स्मारकाचे स्मारकाला अभिवादन करून पहाटे दिवे लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास प्रा.डॉ.लिलाधर पाटील,प्रा.डॉ.विलास पाटील, सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर निकम, अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंत पाटील, शेतकी संचालक प्रा.सुभाष पाटील, सरपंच परीषदेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे प्रा.डि.एम.पाटील, गुणवंत पवार, वाल्मिक पाटील, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.अशोक पवार, व्ही.ए.पाटील, राजमुद्रा फॏंडेशनचे श्याम पाटील, वसंत नेरकर,भुपेंद्र पाटील, विनोद पाटील, दिलीप ठेकेदार, उमेश काटे, बाळु पाटील बी एम पाटील, सुनील काटे, श्रीकांत चिखलोदकर, चंद्रकांत देसले, गोपाल हडपे तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वैशाली शेवाळे,नुतन पाटील , श्रीमती खैरनार,सिमा रगडे , ललिता पाटील,ज्योती भावसार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष डॉ कुणाल पवार यांनी सुत्रसंचलन केले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, सचिव बापुराव ठाकरे, उपाध्यक्ष निंबाजी पाटील, योगेश भदाणे , शहराध्यक्ष डॉ कुणाल पवार, प्रेमराज पवार, मराठा सेवा संघाचे तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे प्रमुख उमेश काटे यांनी परिश्रम घेतले.
—-
अमळनेर- शिव पहाट कार्यक्रमात गीत सादर करताना कैलास पाटील इंजि उज्वल पाटील वसुंधरा लांडगे

