छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.
1 min read

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

Loading

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव
उत्साहात साजरा.

मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे )

फेब्रुवारी महिना आला की वेध लागतात ते हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे. १९ फेब्रुवारी रोजी सर्व जगात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सकल मराठा समाज सायन कोळीवाडा दक्षिण मध्य मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा केला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून भगव्या अशी पालखी सारे वातावरण भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा असलेले झेंडे सायन कोळीवाडा प्रतीक्षा, नगर माला नगर, दादर या विभागातील डौलाने फडकत होते.पूर्ण भगव्यामय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शोभा यात्रेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. सोसायटीच्या इमारतीवरून व रस्त्यावर दुतर्फा गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पुरी मुंबई या दिवशी दुमदुमली.

सायन प्रतीक्षा नगर,माला गार्डन येथून छत्रपती शिवाजी महाराजांनाची शिवज्योत घेऊन रवाना झालेले शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मराठा चौकात दाखल झाले. सायंकाळी६ वाजता पालखी व भव्य मिरवणूक, लेझिम पथक, ढोल ताशा पथक,व छत्रपती शिवरायांच्या जयघोषात निघालेल्या भव्य शोभा यात्रेने सारे वातावरण शिवमय झाले होते.

• विशेष वेशभूषा, मराठा चौक येथून सुरुवात • सायं ९ वाजता : छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व महाआरती • सायं ९ : २० वा : विशेष वेशभूषा व मान्यवरांचे सन्मान • सायं ९ : ५० वाजता : महाराष्ट्र गीताने व राष्ट्रगीताने कार्यक्रम समाप्त झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन अध्यक्ष श्री. युवराज नारायण सूर्यवंशी व उपाध्यक्ष श्री. अभिजीत हनुमंत यांनी उत्कृष्टपणे केले.
श्री. प्रकाश जनार्दन बोटे-पाटील यज्ञेश्वर लक्ष्मण लोटेकर,करण बाजीराव साबळे सौ. अनिता बबन जाधव श्री सचिन पाटील
श्री. अरविंद चंद्रकांत मोरे,सौ. विजया दिलीप पाटील,श्री. संजय जगदाळे,खजिनदार श्री. किरण सुरेश माने,श्री. अरविंद वरंडे
उपखजिनदार श्री. विकास सुभाष बोरगे व असंख्य शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी शोभायात्राा सफल करण्यासाठी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *