अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून!
![]()
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी
दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रथमच विविध विषयांवर सलग दोन तास चर्चा होऊन संपन्न झाली. बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करीत संचालक मंडळाच्या अभिनंदनचा ठराव उपस्थित शेतकऱ्यांनी या ठिकाणी मंजूर केला. याप्रसंगी हजारो शेतकरी सभासदांना बाजार समितीच्यावतीने ट्रॅव्हल बॅग भेट देण्यात आली.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पिरण पाटील हे होते. याप्रसंगी उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संबंधित अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करून सविस्तर चर्चा केली. सदर सभेत उपस्थित शेतकरी व सभासद जयवंतराव पाटील , गावरान जागल्या सेनेचे प्रा गणेश पवार, अनिल बोरसे, शिवाजीराव पाटील, गणेश भामरे,संजय पाटील,विकास धोंडू पाटील,रमेश पाटील,दिलीप पाटील आदींनी बाजार समितीची संबंधित विविध प्रश्न मांडत आजची मार्केटची आर्थिक परिस्थिती, कापूस खरेदी केंद्र सुरू करणे बाबत तसेच मारवड उपबाजार विकसित करणे व गुरांचा बाजार सुरू करणे बाबत विषय उपस्थित केले.

शेतकऱ्यांचे हिताचे काम बाजार समितीत सुरू असून बाजार समिती आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेली आहे समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन व विविध विकास काम लवकर सुरू होणार आहे असे सांगत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधान होईल असे उत्तर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी दिले. डॉ.अनिल शिंदे,भोजमल पाटील यांनी ही उत्तर दिलीत तर सभेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित संचालकांनी केले. प्रस्तावना हिरालाल पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन संचालक प्रा. सुभाष पाटील यांनी केले.यावेळी बाजारसमितीच्या हिशोबाचे वाचन सचिव डॉ.उन्मेष राठोड व योगेश महाजन केले. सभेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ अनिल शिंदे,प्रा.सुभाष पाटील, डॉ.अशोक पाटील, भोजमाल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, सौ सुषमा देसले,सौ पुष्पा पाटील, नितीन पाटील,भाईदास भिल, प्रकाश अमृतकार ,ऋषभ पारेख, शरद पाटील आदींसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


