प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन  नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदारांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती
1 min read

प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदारांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

Loading

प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन

नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदारांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

अमळनेर-येथील प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरवातीला राज्य गीत सादर करण्यात आले,यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक श्री बारबोले,पोलीस निरीक्षक विकास देवरे,न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर,जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,घनश्याम पाटील,राजेंद्र यादव,निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा,अरुण पाटील,नर्मदा वाडीचे अध्यक्ष नितीन कुमार शाह,सौ उज्वला शिरोडे,सौ संगीता जैन,बांधकाम अभियंता डिगंबर वाघ,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे ,महेश जोशी,प्रभाकर पाटील, साखरलाल महाजन,गोविंदा बाविस्कर यासह श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य व नप कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

नाट्यगृहातही दिली मानवंदना

नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदार अनिल पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी मानवंदना दिली.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *