बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक
1 min read

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक

Loading

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006: चाळीसगांवमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 18.02.2025 रोजी चाळीसगांव तहसिल कार्यालयातील सभागृहात “बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006” च्या अंमलबजावणीबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षत्व मा. प्रमोद हिले, उपविभागीय दंडाधिकारी, चाळीसगांव यांनी केले.
सदर बैठकीस चाळीसगांवचे तहसिलदार, मुख्याधिकारी नगर पालिका, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन्सच्या सहायक पोलीस निरीक्षक, मेहूणबारे पोलीस स्टेशन्सचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभात, मा. उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगांव यांनी “बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006” आणि “महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध नियम 2022” याबाबत उपस्थित सर्वांना माहिती दिली. शासनाने दिलेल्या अधिसुचनेनुसार, बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे कार्यान्वयन कसे करावे याबाबत विभागीय उपाययोजनांची माहिती दिली.
किशोरवयीन मुलींचे साखरपुडा आणि लग्न सोहळ्यांचे आयोजन आणि थांबविण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने कार्यवाही करणे, तसेच विवाह लावणाऱ्या ब्राम्हणांच्या नोंदी करणे, धार्मिक स्थळे आणि मंगल कार्यालयांचा शोध घेणे याबाबत निर्देश देण्यात आले.
तसेच किशोरवयीन मुलींच्या संदर्भात सर्व आवश्यक माहिती संकलित करणे, त्यांची गृहभेटी देणे, शपथपत्र लिहून घेणे, ग्रामीण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे इत्यादी कार्ये मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करण्यासाठी निर्देशित करण्यात आले.

 

 

 

 

 

याशिवाय, 18 वर्षाखालील गर्भधारणा असलेल्या मुलींची संख्या नोंद ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
चाळीसगांव उपविभागात बालविवाहाच्या घटनांचे विशेष लक्ष ठेवले जावे, आणि सर्व संबंधित विभागांनी प्रभावी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत वेळोवेळी अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *