17 फेब्रुवारी 2025 रोजीचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथील लक्षणिक धरणे आंदोलन यशस्वी* *खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांना दिले मागण्यांचे निवेदन*
1 min read

17 फेब्रुवारी 2025 रोजीचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथील लक्षणिक धरणे आंदोलन यशस्वी* *खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांना दिले मागण्यांचे निवेदन*

Loading

*दि.17 फेब्रुवारी 2025 रोजीचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथील लक्षणिक धरणे आंदोलन यशस्वी*
*खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांना दिले मागण्यांचे निवेदन*

अमळनेर प्रतिनिधी

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती शासनाने ऑक्टोबर 2017 पासून मानधनात वाढ केलेली नाही.
महागाई प्रचंड वाढलेली असून मध्यवर्ती शासनाकडून अंगणवाडी सेवकांना 4500/- रूपये आणि मदतनिसांना 2250/- रूपये मिनी अंगणवाडी सेविकांना 3250/- रूपये असे अत्यल्प मानधन दिले जाते सदर मानधनात उदरनिर्वाह करणे अशक्य होत आहे म्हणून महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ देण्यात यावी.
तसेच देशात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची रजा तसेच एक महिना उन्हाळी सुट्टी घेण्यात यावी.
मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी व अन्य भत्ते लागू करण्यात यावे.
मा.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्यात यावी.
सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 6000/- रूपये पेन्शन लागू करण्यात यावी.
वरील प्रलंबित मागण्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पिय अधिवेशनात मंजूर कराव्यात.
यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर आणि कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर वर दि.17 फेब्रुवारी 2025 रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

 

 

 

 

धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ.श्रीमती शोभा बच्छाव यांना दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वरील मागण्या लोकसभेत मांडून त्या मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल.असे आश्वासन श्रीमती बच्छाव यांनी शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळात रामकृष्ण पाटील यांच्यासह प्रियंका पाटील, प्रेरणा यादव, छबी पवार यांनी भागीदारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *