पिंपळी महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन शिबिर : विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी योग्य दिशा
![]()
पिंपळी महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन शिबिर : विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी योग्य दिशा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन
पिंपळी, ता. अमळनेर महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशासकीय आघाडीवर उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. I K D क्लासेस चे संचालक श्रीमान प्रा. किरण माळी सर यांचं अनमोल मार्गदर्शन या शिबिरात लाभले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा.माळी सरांनी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी वेळेचे नियोजन, पेपर मांडणी, आत्मविश्वास, मनातील परीक्षेची भीती यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
यावेळीच्या संवादात, माळी सरांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन साधत एक आनंदी वातावरण निर्माण केले, जेथे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा किरण माळी सरांनी विद्यालयाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी रुपये 5000 च्या रोख स्वरूपात देणगी दिली. याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास शेलकर सर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जीवनलाल भिवसन जाधव उपस्थित होते, आणि या प्रसंगी संस्थेचे संचालक आबासो सुधाकर रघुनाथ महाजन, पालक प्रतिनिधी श्री मुरलीधर भुरा महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश सावळे सर यांनी केले.
यावेळी झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य दिशा सापडली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले…

