“शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांना ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ ने सन्मानित”
![]()
“शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांना ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ ने सन्मानित”
अमळनेर प्रतिनिधी – जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी व ग स संचालक विजय शांतीलाल पवार यांना मुंबई प्रेस क्लब येथे अत्यंत मानाची ‘टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण राजीव निवतकर (भा प्र से), आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या शुभ हस्ते झाले. सोबतच नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे पऱ्चवीस हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला.
या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉ विवेक पाकमोडे, सलाम मुंबई फाउंडेशनच्या CEO नंदिता रामचंद्रन, व एन एस फाउंडेशनच्या CEO मनिष जोशी यांनी हजर राहून विजय पवार यांच्या कार्याचे कौतुक केले.
तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे आणि व्यसनमुक्त पिढी तयार करणे ह्या हेतूने विजय पवार यांनी रावेर, भुसावळ व मुक्ताईनगरमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात त्यांचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरले, जिथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी जिल्ह्यात सर्व तालुक्यात तंबाखूमुक्त शाळा अभियानाची कार्यवाही सुनिश्चित केली.
शाळा मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करून तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र विजय पवार यांचे अभिनंदन होत आहे.
विजय पवार यांच्या या कार्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा निर्माण झाली आहे, ज्याचा लाभ आगामी पिढ्यांना होईल.


