पात्र व अनुभवी मदतनीसांना सेविकांच्या रिक्त पदी थेट नियुक्ती द्या.अन्यथा न्यायालयात दाद मागणार-रामकृष्ण पाटील
![]()
पात्र व अनुभवी मदतनीसांना सेविकांच्या रिक्त पदी थेट नियुक्ती द्या.अन्यथा न्यायालयात दाद मागणार-रामकृष्ण पाटील
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे भरण्याबाबत शासनाने 30 जानेवारी 2025 रोजी आदेश काढला आहे.
त्याअनुषंगाने मा.आयुक्त एबाविसेयो रायगड भवन बेलापूर यांनी 31 जानेवारी 2025 रोजी सदर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी दि.03 फेब्रुवारी 2025 रोजी भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्यानुसार दि.06 फेब्रुवारी 2025 रोजी भरतीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू केली आहे.
भरती प्रक्रिया सुरू झाल्याने सन 2023 मध्ये नियुक्त झालेल्या आणि अंगणवाडी सेविकांच्या पदासाठी अनुभवी असलेल्या शैक्षणिक अर्हता प्राप्त मदतनीसांना केवळ दोन वर्षाचा अनुभव नसल्याने शैक्षणिक अर्हता प्राप्त असूनही थेट नियुक्ती पासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळें त्यांचे आयुष्यभराचे मोठे नुकसान झाले आहे.
म्हणुन दि.02 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयातील दोन वर्ष अनुभवाची अट शिथील करावी तसेच सेविका पदासाठी पात्र व अनुभवी मदतनीस असलेली गावे भरतीच्या जाहिरातींमधून वागळण्यात यावी आणि 2023 मध्ये नियुक्त केलेल्या मदतनीस यांना सेविकांच्या रिक्त पदी थेट नियुक्ती द्यावी.
अशी मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी मंत्री आणि सचिव महीला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई तसेच आयुक्त रायगड भवन बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच मागणी मान्य न झाल्यास मा.उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असाही इशारा श्री.पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

