हास्याची जादू: प्रा. महेंद्र गणपूले यांच्या हास्यनगरी सादरीकरणाच्या कार्यक्रमाने श्रोते झाले लोटपोट…
1 min read

हास्याची जादू: प्रा. महेंद्र गणपूले यांच्या हास्यनगरी सादरीकरणाच्या कार्यक्रमाने श्रोते झाले लोटपोट…

Loading

हास्याची जादू: प्रा. महेंद्र गणपूले यांच्या हास्यनगरी सादरीकरणाच्या कार्यक्रमाने श्रोते झाले लोटपोट…

जळगाव ग्रंथोत्सव 2024 च्या कार्यक्रमात श्रोत्यांनी दिली मोठ्या संख्येने दाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रा. महेंद्र गणपूले यांच्या हास्यनगरी सादरीकरणात हसण्याची कला आणि महत्व तसेच मानवाच्या जीवनातील हास्याची भूमिका याबद्दल खूप काही शिकण्यासारखे आहे.
अमळनेरच्या सानेगुरुजी ग्रंथालयातील टाऊन हाँल कार्यक्रमात प्रा. गणपूले यांनी त्यांच्या मजेशीर व्याख्यानाद्वारे श्रोतांना हसवून लोटपोट केले. त्यांच्या संवादातील चातुर्य आणि विनोदाने उपस्थितांचा एक अजिबातच वेगळा अनुभव झाला.
आजच्या युगात जेव्हा माणूस अनेक ताणतणावांच्या काळात जगत आहे, तेव्हा हास्याची आवश्यकताही वर्धिष्णु होते. प्रा. गणपूले यांचे विचार सुचावणारे आहेत की हसणे ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही, तर ती आत्मिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे.
प्रा. महेंद्र गणपूले सरांनी जळगांव ग्रंथोत्सवामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमात हास्याची जादू कशी अप्रतीम होती, याची कल्पना येते! त्यांच्या वेगवेगळ्या आवाजांच्या प्रकारांनी श्रोतांना लोटपोट करून ठेवले, हे नक्कीच एक विशेष अनुभव होता.
ते विविध आवाजांद्वारे कथा सांगताना किंवा विनोदी परिस्थिति साकारतांना, श्रोत्यांच्या मनात चांगल्या हास्याची लाट निर्माण करतात. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना एकत्रितपणे हसण्यास संधी मिळाली आणि एक आनंददायी वातावरण तयार झाले.
प्रा. महेंद्र गणपूले सरांची मिमिक्रीच्या क्षेत्रातील कला खरोखरच अद्वितीय आहे! त्यांनी जळगांव ग्रंथोत्सवात गाण्यांच्या विविध आयामांवर मजेदार मिमिक्री करून श्रोत्यांना लोटपोट केले, हे अत्यंत आनंददायक आहे.
अगोदरची गाणी आणि आताची गाणी यांतील फरक दर्शवताना त्यांनी अनेक कलाकारांचे आवाज आणि अदा अत्यंत प्रभावीपणे केल्या.
ज्यामुळे उपस्थितांना हसण्याचा एक नवा अनुभव मिळाला. प्रा.महेंद्र गणपूले यांनी हास्यनगरी कार्यक्रमात एकत्रितपणे गाण्यांच्या जुने-नवीन आव्हाने ऐकतांना श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनाल महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या संयुक विदयामानाने जळगांव ग्रंथोत्सव 2024हा कार्यक्रम सानेगुरुजी वाचनालय टाऊन हाँल जवळ 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात रविवारी सकाळी वाजता दहा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.
विचारपिठावर हास्य नागरीचे सादरकर्ते
प्रा महेंद्र गणपूले,जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगावचे सुहास रोकडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिकचे सुनिल जगताप,स्वादिष्ट नमकीनचे युवा उदयोजक विजय पाटील,मा.नगरसेवक श्याम पाटील, सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ होते..यावेळी मान्यवरांचा पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

ग्रंथालय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे,सतीश पाटील अध्यक्ष ग्रंथालय संघ जळगांव, सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष डॉ माधूरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक जेष्ट संचालक भिमराव जाधव,अँड रामकृष्ण उपासनी, सुमित धाडकर,निलेश पाटील, दिपक वाल्हे,ईश्वर महाजन, अमळनेर तालुक्यातील ग्रंथालय वाचनालयाचे अध्यक्ष नरेंद्र महाजन, व
व्हि.सी.पाटील मांडळ,विजय बोरसे सोनखेडी,शशिकांत पाटील शिरूड,संदीप पाटील जवखेडा,शिवाजी पाटील वावडे,प्रविण पवार पातोंडा,श्याम पवार खेडी,बी.के सुर्यवंशी खौशी,डि.एम पाटील जानवे,सुनील अहिरराव बोहरा,सह जळगांव जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष व पदाधिकारी,कर्मचारी व सर्व क्षेत्रातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे यांनी केले.
यावेळी विविध बुक स्टाल लावण्यात आली होती.यावर वाचकांनी पुस्तके खरेदी केली.व काहीनी विविध पुस्तके चाळली तर
ग्रंथोत्सवामध्ये दोन दिवस गणपती हॉस्पिटल क्रिटिकल मोफत आरोग्य तपासणी डॉ पंकज महाजन व डाँ मयूर संतोष महाजन यांच्या टीमने अनेक वाचन प्रेमींची वेगवेगळ्या प्रकारचे मोफत विनामूल्य आरोग्य तपासणी केली.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *