कुत्रीम बुद्धिमत्तेच्या (एआय) दिशेने ग्रंथालयांची वाटचाल: हितेश ब्रिजवासी यांचे मार्गदर्शन अमळनेरला ग्रंथोत्सव 2024 मध्ये जिल्ह्यातील ग्रंथालय व वाचनालयाच्या पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती
कुत्रीम बुद्धिमत्तेच्या (एआय) दिशेने ग्रंथालयांची वाटचाल: हितेश ब्रिजवासी यांचे मार्गदर्शन
अमळनेरला ग्रंथोत्सव 2024 मध्ये जिल्ह्यातील ग्रंथालय व वाचनालयाच्या पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
हितेश ब्रिजवासी यांनी ग्रंथालयांच्या विकासाबद्दल बोलतांना सांगितले कि
ग्रंथालयांची स्थापना आणि विकास
ग्रंथालयांची निर्मिती प्राचीन काळात झाली, जेव्हा ज्ञानाचे कागदपत्रात रूपांतर केले गेले. या काळात ग्रंथालये धार्मिक आणि शैक्षणिक ज्ञानाचे केंद्र होती.याच्या काळात ग्रंथालये विद्यापीठांची आणि शैक्षणिक संस्थांची भाग होती, जिथे विदयार्थ्यांना संदर्भ ग्रंथ सापडण्यास मदत मिळत होती.
सध्याच्या पिढ्या पारंपरिक ग्रंथालये
जळगावमध्ये अजूनही पारंपरिक ग्रंथालयांचा अस्तित्व आहे, जिथे वाचनालये, शालेय ग्रंथालये आणि सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे डिजिटल ग्रंथालये फुलवली आहेत. यामध्ये ई-बुक्स, लेख, शोधनिबंध, आणि ऑनलाइन संसाधने उपलब्ध आहेत.
-सहयोगात्मक ग्रंथालये: या पिढीतील ग्रंथालये एकमेकांच्या सहकार्याने ज्ञानाचा प्रसार करतात आणि सामायिक संसाधनांचा वापर करतात.
एआयचा वापर करण्यामुळे वाचनयार्थींचे अनुभव सुधारले जात आहेत. ग्रंथालये आता वैयक्तिकृत शिफारसी देऊ शकतात.
एआय तंत्रज्ञान डेटा व्यवस्थापनात उत्कृष्टता आणत आहे, ज्यामुळे ग्रंथालये त्यांच्या संसाधनांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करू शकतात.अशा प्रकारे, ग्रंथालये आता विकासाच्या नवनवीन टप्प्यावर आहेत, ज्यानुसार ती ज्ञानाचे केंद्र बनण्याबाजूला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम आणि उपयुक्त बनत आहेत असे अमळनेरला ग्रंथोत्सव 2024 या दोन दिवसीय कार्यक्रमात
व्याख्याते हितेश ब्रिजवासी यांनी कुत्रीम बुद्धीमत्तेच्या (AI) दिशेने ग्रंथालयाची वाटचाल यावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनाल महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या संयुक विदयामानाने जळगांव ग्रंथोत्सव 2024हा कार्यक्रम सानेगुरुजी वाचनालय टाऊन हाँल जवळ 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात रविवारी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रमुख अतिथी जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगावचे सुहास रोकडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिकचे सुनिल जगताप,व्याख्याते हितेश ब्रिजवासी (जळगांव)
सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ होते..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सतीश पाटील अध्यक्ष ग्रंथालय संघ जळगांव, ,सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष डॉ माधूरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक जेष्ट संचालक भिमराव जाधव,अँड रामकृष्ण उपासनी, सुमित धाडकर,निलेश पाटील, दिपक वाल्हे,ईश्वर महाजन, अमळनेर तालुक्यातील वाचनालय व ग्रंथालय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे,ग्रंथालय वाचनालयाचे अध्यक्ष नरेंद्र महाजन, व व्हि.सी.पाटील मांडळ,विजय बोरसे सोनखेडी,शशिकांत पाटील शिरूड,संदीप पाटील जवखेडा,शिवाजी पाटील वावडे,प्रविण पवार पातोंडा,श्याम पवार खेडी,बी.के सुर्यवंशी खौशी,डि.एम पाटील जानवे,सुनील अहिरराव बोहरा,सह जळगांव जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष व पदाधिकारी,कर्मचारी व सर्व क्षेत्रातील बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे यांनी केले.
यावेळी विविध बुक स्टाल लावण्यात आली होती.यावर वाचकांनी पुस्तके खरेदी केली.व काहीनी विविध पुस्तके चाळली तर
ग्रंथोत्सवामध्ये दोन दिवस गणपती हॉस्पिटल क्रिटिकल मोफत आरोग्य तपासणी डॉ पंकज महाजन व डाँ मयूर संतोष महाजन यांच्या टीमने अनेक वाचन प्रेमींची वेगवेगळ्या प्रकारचे मोफत विनामूल्य आरोग्य तपासणी केली.
This website is using a security service to protect itself from online attacks. The action you just performed triggered the security solution. There are several actions that could trigger this block including submitting a certain word or phrase, a SQL command or malformed data.
What can I do to resolve this?
You can email the site owner to let them know you were blocked. Please include what you were doing when this page came up and the Cloudflare Ray ID found at the bottom of this page.