“ज्ञानाच्या दीपस्तंभांचा सत्कार: ग्रंथपालांचा अभिमान!” डॉ डिगंबर महाले अध्यक्ष मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर जळगाव ग्रंथोत्सव 2024 च्या अमळनेर येथील समारोप प्रसंगी प्रतिपादन
![]()
“ज्ञानाच्या दीपस्तंभांचा सत्कार: ग्रंथपालांचा अभिमान!”
डॉ डिगंबर महाले
अध्यक्ष मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेरजळगाव ग्रंथोत्सव 2024 च्या अमळनेर येथील समारोप प्रसंगी प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात जळगाव ग्रंथोत्सव 2024 च्या समारोपप्रसंगी बोलतांना म्हणाले की ग्रंथपालांचा पहिला सत्कार करतांना विचारलेल्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
ते म्हणाले, “ग्रंथपालांचा सत्कार माझ्या हातून पहिल्यांदाच होत आहे, आणि याचा मला खूप आनंद आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, “स्पर्धेच्या युगात ग्रंथालय चळवळ काही प्रमाणात कालबाह्य झाल्यासुद्धा ती टिकून आहे. दर्जेदार साहित्य वाचणारे वाचक अद्यापही भरपूर आहेत.”
मोबाईलवर वाचनाचे महत्त्व साक्षात केले, “मोबाईलवरचे पुस्तक वाचून समाधान होत नाही—वाचनाची मूळ गहराई अनुभवणं आवश्यक आहे.”
महाले यांनी विश्वास व्यक्त केला की, “वाचन संस्कृती आज आहे, आणि ती भविष्यातही कायम राहील.” त्यांनी पुढे सांगितले की, “बदलत्या काळानुसार ग्रंथपालांना अद्ययावत राहणे आवश्यक आहे, अन्यथा वाचन संस्कृतीपासून विद्यार्थ्यांचे लांब चालणे सुरू होईल.” “ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत पोहोचण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे, जेणेकरून वाचनाची पायरी पुन्हा मजबूत करता येईल.” असे जळगाव ग्रंथ उत्सव 2024 च्या महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव व पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने समारोप कार्यक्रमात व तालुक्यातील साहित्यिक व दीर्घकालीन सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून मंगळ ग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ डिगंबर महाले बोलत होते

विचारपिठावर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह
सेवा संस्थाचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले ,व्याख्याते हितेश ब्रिजवासी, सह आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकचे कपिल पवार, जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिकचे सुनील जगताप, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,चिटणीस प्रकाश वाघ होते
जिल्ह्यातील पाच साहित्यिक यांचा सत्कार व स्वर्गवासी सीमा धाडकर साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाच्या ग्रंथपाल यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर पुरस्कार कार्यक्रमाचे मान्यवर यांनी स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र दिला व त्यांच्या परीवारातील सदस्य यांनी तो स्विकारला. नंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व वाचनालयांच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जळगाव ग्रंथोत्सव 2024 च्या ग्रंथ दिंडी कार्यक्रमांमध्ये शहरातील शाळांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांना यावेळी मान्यवरांनी सन्मानपत्र ,स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला..
उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल दोन दिवस खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांचा कार्यक्रमाचे मान्यवर यांनी स्मृतीचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले व आभार सर्व उपस्थित मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल,पत्रकार व सर्व क्षेत्रातील बंधू भगिनी यांचे वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ यांनी मानले


