पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो – मा.श्री. जगदीशभाऊ गुप्ता
1 min read

पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो – मा.श्री. जगदीशभाऊ गुप्ता

Loading

पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो – मा.श्री. जगदीशभाऊ गुप्ता

 

चिखलदरा:- (प्रतिनिधी) गणित आणि विज्ञानाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी “नॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्सेस (NCRTMAS S-2025)” या राष्ट्रीय परिषदचे आयोजन कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथे करण्यात आले होते. परिषदेत अध्यक्षीय भाषण देताना मा. जगदीश भाऊ गुप्ता यांनी आपल्यातील आपण जुन्या विचारांची धूळ काढून टाकली पाहिजे. स्पेस सायन्स चा उपयोग समाजाला झाला पाहिजे असे विचार मांडले .
परिषदेत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून मा. माजी राज्यमंत्री तथा सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री जगदीशभाऊ गुप्ता, डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. रवींद्र कडू
मा.महामहीम राज्यपाल नामीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, मा. श्री प्रशांत श.तायडे सचिव सिपना शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती, मा. श्री विजयजी खंडेलवाल संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती,डॉ. डी. डी. पवार प्रोफेसर अँड डायरेक्टर स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स अँड रजिस्टार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ. व्ही. ए. शर्मा प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स नरसम्मा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अमरावती चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज मॅथेमॅटिक्स अँड मेंबर ऑफ मॅनेजमेंट कौन्सिल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ .जगदीश ननावरे (प्राध्यापक व विभागप्रमुख, गणित विभाग व चेअरमन बोर्ड ऑफ स्टडी, बी.ए.एम.यू., छत्रपती संभाजीनगर), महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी प्र -कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ. राजेश जयपूरकर, डॉ. गोपाल ढोकणे प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स तथा चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज फिजिक्स मेंबर ऑफ अकॅडमी कौन्सिल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,संयोजक ( पीएम उषा) डॉ.व्ही.आर. पाटील संयोजक एन सी आर टी एम ए एस एस २०२५, गणित विभाग प्रमुख, सहआयोजक प्रा. एन. एस.
बायस्कर गणित विभाग, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न झाले.
पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो त्याबाबतीतही विचार विमर्श झाला पाहिजे. तर डॉ .मिलिंदजी बारहाते यांनी जग झपाट्याने बदलत आहे हा बदल या महाविद्यालयाने ‘A’ ग्रेट मिळवून स्वीकारला आहे. म्हणूनच या महाविद्यालयाने ज्ञानाची गंगा आदिवासी कोरकू पर्यंत पोहोचवली. गणित हा विषय क्षमतेच्या बाहेरचा असला तरी त्याची आज नितांत गरज आहे. आपल्या देशाला श्रीमंत अशा परंपरा लाभल्या आहेत. त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आज नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारले पाहिजे. गणित हा विषय सामाजिक दृष्ट्या उपयोगी आला पाहिजे. या परिषदेतून काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले. डॉ. रवींद्र कडू म्हणाले, संपूर्ण जगाला शून्याची देणगी आपल्या देशांनी दिली यावरून गणिताची संकल्पना ही जुनी आहे अबॅकस, आय. के. एस. याच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रसार होणे गरजेचे आहे.अबॅकस च्या वरची पातळी गणिताने गाठली पाहिजे. आपल्या प्रास्ताविकात,डॉ. राजेश जयपूरकर यांनी महाविद्यालयाचा 1996 पासून शैक्षणिक विकास या दुर्गम भागात कसा झाला थोडक्यात आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. विद्या शर्मा यांनी देखील आपले विचार मांडलेत. डॉ.डी. डी. पवार यांनी आधुनिक गणितीय संशोधनाच्या संधी आणि आव्हाने याविषयी विचार मांडले.
तांत्रिक सत्र: संशोधन सादरीकरणे आणि चर्चा
परिषदेत विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती, जिथे संशोधकांनी आपले नवीन शोध, विश्लेषण आणि गणितीय मॉडेल्स सादर केले.
संध्याकाळच्या सत्रात डॉ. एस. डब्ल्यू. भवारे, डॉ. आर. व्ही. मापारी, डॉ. ए. एन. रंगारी, आणि डॉ. एस. आर. कुंभारे , डॉ, विनोद दगवाल डॉ. पी.पी.खडे.यांच्या उपस्थितीत विविध संशोधन पेपर्स आणि पोस्टर प्रदर्शनांचे परीक्षण झाले. यामध्ये नव्या संशोधन पद्धतींवर चर्चा झाली.
परिषदेच्या समारोप सत्रात प्राचार्य, डॉ. आर. एस. जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण आणि प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी डॉ. एच. आर. देशमुख डीन फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,प्रा. डॉ. जी.यू खापेकर डॉ. बी. मिश्रा बी.आय. टी. एस. पिलानी हैदराबाद, डॉ. गणेश केदार आर. टी. एम. नागपूर विद्यापीठ डॉ बी. आर. सोनटक्के
प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण इत्यादींनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. प्रियंका गायकवाड पुसद , प्रणव भेंडे अमरावती
राहुल मापारी गडचिरोली, या सहभागी मान्यवरांनी आपले मत समर्पक शब्दात परिषदेविषयी मांडलेत. ते म्हणाले, संशोधन पेपर सादरीकरण व पोस्टर सादरीकरण खूपच छान होते.
ही या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. व्ही. आर. पाटील, सह-संयोजक प्रा. एन. एस. बायस्कर आणि संपूर्ण सहकारी प्राध्यापकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. परिषदेत(१६०) सहभागी झालेल्या संशोधकांनी त्यांच्या मौलिक योगदानामुळे हा कार्यक्रम विशेषत्वाने लक्षवेधी केला.
संशोधनाच्या नव्या वाटा शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली.
ही परिषद गणित आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी एक प्रेरणादायी ठरली. अशा संमेलनांच्या माध्यमातून नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन होईल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्षितिज शहा यांनी तर आभार डॉ. व्ही.आर.पाटील यांनी मानले. असे महाविद्यालय प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मुकेश सरदार यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *