रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना
1 min read

रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना

Loading

रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना

**अमळनेर प्रतिनिधी:**
खा.शि.मं. संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल, अमळनेरमध्ये आज रथसप्तमी निमित्ताने उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सूर्य देवतेचे पूजन आणि सुर्यमंत्राचा जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री ए डि भदाणे सर, पंतजली योग तज्ञ व योग गुरु श्री गजाजन माळी सर, तसेच अन्य मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

योग गुरु श्री गजानन माळी सरांनी विद्यार्थ्यांना बारा स्टेप्समध्ये सूर्यनमस्कार करून दाखवला. यानंतर त्यांनी योग आणि व्यायामाचे महत्व सांगितले आणि आजारांवर मात करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास महत्त्व दिले. “विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम करावा,” असे मार्गदर्शन त्यांनी दिले.

मुख्याध्यापक श्री बी एस पाटील यांनी सूर्यनमस्काराचे शरिरासाठी असणारे फायदे उपस्थितांना स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर एन सांळुखे, श्री एस आर अहिरे सर, क्रीडा विभागाचे प्रमुख श्री जे व्ही बाविस्कर सर, आणि इतर शिक्षकांनी केले. धन्यवाद श्री जे व्ही बाविस्कर यांनी मानले.

रथसप्तमी साजरा करून शाळा व विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकात्मता साधण्याचा एक महत्त्वाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य अनमोल ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *