शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंचे आश्वासन: जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार मुंबईत बैठक
![]()
शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंचे आश्वासन: जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार मुंबईत बैठक
जळगांव प्रतिनिधी – आज रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नामदार शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्या कार्यालयात मालेगांव येथे संघटनेच्या उपाध्यक्ष प्रा. संपत कदम व नाशिक जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २००५ पूर्वी अंशतः अनुदान व २००५ नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे निवेदन सादर केले.
या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले की, मुंबई येथे भेटून बैठक घेऊन विषयावर चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य अंशतः/टप्पा (२००५ पूर्वी) अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, उत्तर महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी प्रा. अनिल देवरे, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. आनंदा हारदे, मुख्याध्यापक कैलास पवार, नितीन पवार, मुख्याध्यापक संजय वाघ, श्रीधर आमृतकर सर तसेच नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नवीन आशा जागृत झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या पेन्शन प्रश्नाची योग्य सोडवणूक होईल, अशी अपेक्षा आहे.

