शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्या स्नेहसंमेलन !!!!
![]()
शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्या स्नेहसंमेलन !!!!
अमळनेर प्रतिनिधी(सोपान भवरे)
कळमसरे गाव म्हटलं म्हणजे अमळनेर तालुक्यातील एक नामांकित गाव… या गावात सर्व जातीचे लोक राहतात… गावातील विकासासाठी सर्व समाज एकत्रित होणारी गाव… अशा या गावात दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी अप्रतिम होतो.. साहित्याच्या बऱ्याच प्रकाराला स्पर्श करण्याचा प्रयत्न येथील शाळा करीत असते. ही शाळा गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देते. ह्या शाळेतून बाहेर पडलेली मुले इतर महाविद्यालयामध्ये चमकून उठतात… सांस्कृतिक कार्यक्रमात येथील मुलांना नाटक, गीते, एक पात्री अभिनय, फॅन्सी ड्रेस, रॅम्प वॉक, मूकनाट्य, व्यंगात्मक नाट्य, किर्तन , नृत्य यासारखे प्रकार सहज येतात. येथील शाळेतील शिक्षक विविध प्रकारचे उपक्रम राबवून शाळेला एका विशिष्ट उंचीपर्यंत घेऊन जाण्याचे काम करीत असतात… महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी वैचारिक पद्धतीने साजरी होते.. विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनाने शाळेमध्ये उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी असे अनेक उपक्रम शाळा राबवीत असते. यासाठी शाळेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ या कामांमध्ये सहकार्य करीत असते. शाळेचे प्रशासकीय अधिकारी माननीय जी. टी. टाक भाऊसाहेब उपक्रम घेणाऱ्या शिक्षकांना योग्य ते सहकार्य करीत असतात. सर्व मंडळींचे शिक्षकांना सहकार्य असल्यामुळे शाळेमध्ये विविध शाळा पूरक उपक्रम घेतले जातात. शैक्षणिक गुणवत्तेसोबत अशा कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. येथील शिक्षक विविध ठिकाणाहून चांगले असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात. शाळेची शिस्त काटेकोरपणे पाळली जात असल्याने शाळेत उपक्रम सहजरीत्या राबविला जातो. सर्व शिक्षक आनंदाने आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत असतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या ह्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे ही एक ज्ञानात्मक मेजवानी असते. विद्यार्थी पोट तिडकीने आपल्या कला सादर करीत असतात. याही वर्षी विविध नृत्य , पारंपारिक गाणे, नाटके, एक पात्री, लघु नाटिका, कोळीगीत, बंजारा गीत, देशभक्तीपर गीत, लोकगीत, लोकनृत्य, व्यंगात्मक नाट्य, वैचारिक नाटक अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमाची आखणी झाल्याचे बोलले जाते. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता वार शुक्रवार दिनांक 31 तारखेला घेण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील तसेच शेजारच्या गावामध्ये स्नेहसंमेलनाची बातमी पोहोचली आहे.माजी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांना आपल्या पाल्याचे गुण दर्शन बघण्यासाठी येण्याचा विनम्रपणे आग्रह केलेला आहे. गावातील लोकही चांगल्या प्रकारे सहकार्य करीत शाळेला मदत करीत असतात. अगदी शांततेने सदर कार्यक्रम दरवर्षी होत असतात. पोलीस अधिकारी यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत असते. शाळेचे मुख्याध्यापक डी .डी .जाधव यांनी आसपासच्या खेड्यातील तसेच गावातील लोकांना विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बघण्यासाठी येण्यासाठी मजकूर पाठवलेले आहे.

