जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.
1 min read

जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.

Loading

जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.

जळगाव:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल महत्त्वपूर्ण निर्णय घेतांना इ.१० वी, १२वीच्या आगामी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अदलाबदल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून त्यात अंशतः बदल सुचविलेला आहे.महिला कर्मचाऱ्यांची संभाव्य हेळसांड, इ.९वी व ११वी च्या वर्गांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर कर्मचारी अदलाबदल निर्णय त्वरीत मागे घ्यावा यासाठी जळगाव जुक्टो संघटनेच्या वतीने सर्वप्रथम राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न केलेत. यासाठी जुक्टो संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड उपाध्यक्ष डॉ. अतुल इंगळे यांनी सर्व विभागाच्या शिक्षक आमदारांशी संपर्क साधून सदर निर्णयाबाबत फेरविचार करण्यासंदर्भात शासन दरबारी प्रयत्न करण्यासंदर्भात साकडे घातले. यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ.संजय शिंदे, प्रा.मुकुंद आंधळकर, प्रा. संतोष फाजगे, प्रा.सुनील पूर्णपात्रे, श्री.एस.डी.भिरुड, जे.के.पाटील, प्रा.नंदन वळींकार, डी.ए. पाटील, प्रा.शैलेश राणे, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.पी.पी. पाटील, प्रा.संजय पुरी, प्रा. दिलराज पाटील, प्रा.गजानन वंजारी, प्रा.राहुल वराडे, प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा.राजेश कोष्टी यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. सर्व शिक्षक संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य शासनाने निर्णयाचा फेरविचार करीत परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे होतील असे स्पष्ट केले. सदर परीक्षेसाठी जिल्हातील समस्त शिक्षक वर्ग कॉपीमुक्त अभियानात शासनास संपूर्ण सहकार्य करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *