अखिल सुवर्णकार सखी मंचचा *हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर***
1 min read

अखिल सुवर्णकार सखी मंचचा *हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर***

Loading

**अखिल सुवर्णकार सखी मंचचा *हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर***

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे अखिल सुवर्णकार सखी मंचच्या वर्धापनदिनी *हळदी कुंकू कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा* यशस्वीरित्या पार पडला. यादरम्यान, महिला सशक्तिकरण आणि सामाजिक कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या आणि सखी मंचाच्या मार्गदर्शक माननीय सौ. निता अविनाश सोनार यांनी सन- 2025 ची कार्यकारणी जाहीर केली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षा म्हणून सौ. गायत्री सराफ, उपाध्यक्षा सौ. दिपाली सराफ, सह-उपाध्यक्षा सौ. मधुमती भामरे, कोषाध्यक्षा सौ. नूतन भामरे, सह-कोषाध्यक्षा सौ. शितल सोनार यांचा समावेश आहे. माजी अध्यक्षा सौ. दीप्ती अहिरराव व सेक्रेटरी सौ. पूनम भामरे यांच्यासह सौ. हर्षाली सराफ, सौ. समिता भामरे, सह-सेक्रेटरी सौ. जयश्री वाघ आणि सौ. स्वाती पिंगळे तसेच सल्लागार – सौ. निताताई सोनार , श्रीम. पुष्पाताई वानखेडे , श्रीम.देवयानी ताई जाधव, यांची सर्वानुमते निवड करत यांना देखील कामकाजाची जवाबदारी देण्यात आली.
या कार्यकारणीच्या निवडीस सर्वानुमते पाठिंबा देत सामाजिक स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात आले, ज्यामुळे महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. हा कार्यक्रम एकत्रितपणे काम करणाऱ्या महिलांच्या जिद्द आणि एकतेचा प्रतीक बनला, जो येणाऱ्या काळात सशक्त भारतासाठी आदर्श ठरू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *