सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*
1 min read

सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*

Loading

*सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*

 

जळगांव विशेष प्रतिनिधी.( विजय लुल्हे)

[ डॉ .कलाम पुस्तक भिशी तर्फे साहित्यिकांना आवाहन ]
सेवानिवृत्त असूनही निरंतर आजीव ऋषितुल्य ज्ञानदाता ,चिरतरुण समाजशिक्षक , अनेक ज्ञात अज्ञातांचे मानसगुरु , अनेक शैक्षणिक संस्थांचे व शैक्षणिक प्रकल्पांचे अजातशत्रू दिपस्तंभ अर्थात जळगाव डायटचे निवृत्त प्राचार्य आदरणीय नीळकंठ गायकवाड साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.अप्पासाहेब नीळकंठजी गायकवाड यांच्या गौरवार्थ लेख व काव्य स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे करण्यात आले आहे.पुरस्कार हे ‘ साधन ‘ असून अप्पासाहेबांना अमृत महोत्सव निमित्ताने अक्षय शब्दसुमनांची अनोखी भेट देता येईल हे सर्वार्थाने ‘ साध्य ‘ आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.
अप्पासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त करण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचा अर्थात सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घेऊन बहुसंख्येने स्पर्धेची पोस्ट फॉरवर्ड करून इतरांनाही प्रोत्साहित करून स्पर्धा व्यापकपणे अल्पावधीत यशस्वी करावी ही स्पर्धा संयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे सर्वांना विनम्र आवाहन.
सर्वोत्कृष्ट लेख व कवितांना पुढील प्रमाणे बक्षिसे दिले जातील.
*सर्वोत्कृष्ट गौरवपर लेख व काव्य पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – ३१०० रुपये ( प्रायोजक – ह.भ.प.मनोहरजी खोंडे सर )
द्वितीय पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – सोपान भवरे सर )
तृतीय पुरस्कार : – ११०० रुपये ( प्रायोजक – डॉ.विजय बागुल सर )
उत्तेजनार्थ दोन पुरस्कार – ( प्रायोजक – महेश शिंपी सर ) प्रत्येकी ५०० रुपये
*सर्वोत्कृष्ट कविता पुरस्कार*
प्रथम पुरस्कार : – २१०० रुपये ( प्रायोजक – ज्योती राणे मॅडम )
द्वितीय पुरस्कार : – १५०० रुपये ( प्रायोजक – उषाताई सोनार मॅडम )
तृतीय पुरस्कार : – १००० रुपये ( प्रायोजक – सुदाम बडगुजर सर )
उत्तेजनार्थ दोन पुरस्कार ( प्रायोजक – अरुण वांद्रे सर ) प्रत्येकी ५०० रुपये
समस्त सन्माननीय पुरस्कारार्थींना वर्षाताई अहिरराव प्रायोजित आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
*स्पर्धेचे नियम व अटी*
१ ) स्पर्धा सर्वांसाठी निःशुल्क असून गौरवपर लेख व कविता बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ अखेर पाठवाव्यात. २ ) एका व्यक्तीला दोन्ही स्पर्धेत भाग घेता येईल परंतु एकाच विभागात बक्षीस देण्यात येईल.३) लेख व कवितांना शब्द मर्यादा नाही. ४ ) टपालाशिवाय लेख व कविता वर्ड आणि पीडीएफ दोन्ही फॉर्मेट मध्ये पाठविणे नियमाधीन आहे.वर्ड मधील मजकूर युनिकोड फॉन्ट मध्येच असावा.फॉन्ट साईज १२ – १३ दरम्यान वापरावी. पुढील मेलवर साहित्य पाठवावे. vijayslulhe1964@gmil.com
*गौरवलेख व कविता पाठविण्यासाठी पत्ता*
विजय सुपडू लुल्हे
(संस्थापक जिल्हा प्रमुख ,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी )
‘ वात्सल्यसिंधु ‘ निवास असावा नगर भाग – २ गट नं .१९३ भवानी माता मंदिरा जवळ , पिंप्राळा परिसर ता. जि .जळगाव
जळगाव – पीन ४२५००२
टपाला शिवाय गौरवलेख व कविता पुढील पुस्तक भिशी सभासद व हितचिंतक मार्गदर्शकांकडे जमा करता येतील.
* ह.भ.प.मनोहर खोंडे सर ( जळगाव ) – ९२७२३२८४५८
* विजय सुपडू लुल्हे ( जळगाव ) – ९९२३३१५२११
* ईश्वर महाजन सर , अमळनेर ( संपादक ,मराठी लाईव्ह न्यूज ) – ९८६०३५२९६०
* अजय भामरे सर , अमळनेर – ( लेखन मंच संपादक ) – ८८३०३४३७३६
* सोपान भवरे सर, अमळनेर – ( लेखन मंच उपसंपादक ) – ९०७५४१७०३२
* डॉ.विजय बागुल सर ( जळगाव ) – ९४०५७९१५७३
* ज्योती राणे मॅडम ( जळगाव ) – ७५८८१९२११०
* सुनिल दाभाडे सर ( जळगाव ) – ९८२२०१७८८४
* डॉ.जगदिश पाटील सर ( भुसावळ ) – ८१४९४९८०२०
* जितेंद्र गवळी सर ( रावेर ) – ७९७२४४२२७१
* अरुण वांद्रे सर ( जळगाव ) – ९०२११३८७०१
* संदिप गायकवाड सर ( जामनेर ) – ९९७०२०७०८४
* संध्या भोळे मॅडम (भुसावळ ) – ७७०९८२४१७०
* सारिका पाटील मॅडम ( पाचोरा ) – ९३५९६५१९२५
* श्यामकांत रुले सर ( मुक्ताईनगर )- ९८२२८ ४२९५२
* छाया पवार मॅडम ( जळगाव ) – ९४२१५१६८६१
* रणजित सोनवणे सर ( जळगाव ) – ८३२९७८०५३७
स्पर्धेचा निकाल मराठी राजभाषा दिन बुधवार दि .२७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहिर करण्यात येईल असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये स्पर्धेचे मुख्य संयोजक मनोहर खोंडे सर , विजय लुल्हे , वर्षाताई अहिरराव , अभियंता मिलींद काळे, अभियंता संजय भावसार ,आर्किटेक्ट प्रमोद महाजन , निवृत्त प्राचार्य राजू महाजन, प्रकाशक युवराज माळी (अथर्व प्रकाशन, जळगाव ) , गझलकारा आशा साळुंके मॅडम , महेश बच्छाव सर ( चिंचोलीकर ) तसेच मार्गदर्शक शशिकांत हिंगोणेकर साहेब ( निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक विभाग ), सिद्धार्थ नेतकर साहेब ( निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ), अरुण वांद्रे सर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *