पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळाव्याचे आयोजन, समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
1 min read

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळाव्याचे आयोजन, समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळाव्याचे आयोजन,
समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

चऱ्होली फाटा आळंदी पुणे: लेवा पाटील भूषण सरदार वल्लभाई पटेल यांचा आदर्श समाज बांधवांनी घ्यावा. कठोर परिश्रम करून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे तसेच राष्ट्रासाठी, समाजासाठी झटणे हे गुण सरदारांपासून घ्यावे. त्यांनी शेवटपर्यंत राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य केले ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. लेवा पाटीदार समाजाची उत्पत्ती प्रभू रामचंद्रांच्या लवा पासून झालेली आहे असाही एक इतिहास आहे. कठोर परिश्रम, मेहनतीने हा समाज पिंपरी चिंचवड व पुणे शहरात नावा रूपाला येऊन समाजाने एक स्वच्छ प्रतिमा निर्माण केलेली आहे. परंतु अजूनही समाजातील लग्नकार्य व अनिष्ट रूढी परंपरा सुरू असून कालानुरूप बदल करणे अत्यंत गरजेचे आहे व लग्नकार्य सुलभ , सुरळीत होणे गरजेचे आहे. सरदार वल्लभाई पटेल यांचा समर्पित भावनेने कार्य करण्याचा गुण आत्मसात करून समाजासाठी सेवा व्रती भावनेने कार्य करावे, राष्ट्रहितासाठी विविध उपक्रम राबवावे असे मत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन यांनी येथे व्यक्त केले. येथे पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृ मंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा मुक्ताई लॉन चरोली येथे 26 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला .यावेळी माननीय श्री अण्णासाहेब पाटील श्री अमोल इंगळे ,श्री विष्णूबुवा बोरोले यांच्या हस्ते जागेचे भूमिपूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोल भाऊ इंगळे होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोल इंगळे , ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे , उद्योजक पुरुषोत्तम पाटील, नामदेव ढाके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ नेते, नगरसेवक पिंपरी चिंचवड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लीलाधर वराडे, उद्योजक मनोज बऱ्हाटे, मुक्ताई देवस्थान दिघी भोसरी चे अध्यक्ष अमोल पाटील, ह भ प विष्णु बोरोले, समता भातृ मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत झोपे, युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते निनाद वायकोळे, गजानन महाराज सोसायटीचे अध्यक्ष संजय चौधरी या मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,संचालक ,संचालिका स्वीकृत सदस्य ,सल्लागार देखील उपस्थित यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे, दामोदर गोविंद पाचपांडे, पुंजाजी पाटील, सुरेश रामा नारखेडे, राम किनगे, मालती टेकाळे ,शितल नारखेडे, सो मनीषाताई खाचने यांना मानवरांच्या उपस्थित लेवा पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ह्या वेळी लहान मुलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण खूप छान प्रकारे केले. यावेळी पहिली ते बारावी विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलांचे ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेवा संगिनी मंच यांच्या तर्फे हळदी कुंकू व खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम लेवा संगिनी मंचच्या अध्यक्ष सौ दिपाली नारखेडे यांनी घेतला. उपाध्यक्ष सौ रजनी बोंडे, सचिव सौ सुनीता इंगळे, संचालिका सौ अनामिका नारखडे यांच्यासह सौ वसुधा खर्चे, सौ शुभांगी चोपडे यांनीही हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपले योगदान दिले. यावेळी पैठणी चा मान सौ दिशा चोपडे यांना मिळाला तसेच सौ हर्षा बेंडाळे व दुसऱ्या तर सौ शीतल पाटील या तिसऱ्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. मंडळाचे अध्यक्ष श्री निनाभाऊ खर्चे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की परिसरातील सर्व समाज बांधवांनी स्नेहसंमेलन मेळाव्याला उपस्थिती राहुन तसेच सभासद होउन संस्थेला हातभार लावावा. व आलेल्या सर्व सभासदांशी संवाद साधला. तसेच मंडळाच्या नवनिर्वाचित सचिव किरण ताई पाचपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती किनगे यांनी आपल्या सुमधुर वाणीने सादर केले. व आपल्या मंडळाचे सहसचिव गजानन लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *