स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय*  *लोकांच्या मनातील दृढविश्वास पुढे न्यायचाय*  *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे*  *भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन*
1 min read

स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय* *लोकांच्या मनातील दृढविश्वास पुढे न्यायचाय* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे* *भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन*

Loading

*’स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय*

*लोकांच्या मनातील दृढविश्वास पुढे न्यायचाय*

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे*

*भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन*

मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) बोरिवली (पश्चिम) येथील गोराई समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विक प्रकल्पाचे भूमिपूजन काल प्रजासत्ताक दिनी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी स्वयंपुनर्विकास हाच सर्वात उत्तम उपाय असून लोकांच्या मनात जी भावना निर्माण झालीय तो दृढविश्वास पुढे न्यायचा असल्याचे प्रतिपादनही आ. दरेकर यांनी केले.

यावेळी समाधान गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले कि, स्वयंपुनर्विकास हा माझा ध्यास आहे. जिथे सोसायट्या स्वयंपुनर्विकासाला येताहेत त्यांना टोकाची मदत मी करतो. कारण मध्यम वर्गीय मराठी माणूस अशा वसाहतीत राहतो आणि थोडे मोठे घर मिळणे हे त्याचे स्वप्न असते. मी मुंबईत स्वयंपुनर्विकास ही योजना राबविण्याचे ठरवले आणि आज १६०० प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे पुनर्विकासाचे आलेत. त्यातील ३६ जणांना आम्ही कर्ज मंजूर केले असून १२ इमारतींच्या चाव्या देऊन लोकं राहायलाही गेली असल्याचे दरेकर म्हणाले.

आ. दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयंपुनर्विकासात अनेक अडचणी आल्या. त्या आम्ही टप्प्याटप्प्याने सोडवत गेलो. विश्वासाने स्वयंपुनर्विकास पुढे नेत गेलो. त्यानंतर स्वयंपुनर्विकास गती घ्यायला लागला. लोकांची मागणी वाढली. परंतु मुंबई बँकेला पैशाच्या मर्यादा होत्या. मी राज्य सहकारी बँकेला विनंती केली कि, आपण आम्हाला या प्रकल्पासाठी मदत करा. दोन दिवसापूर्वी राज्याचे सहकार मंत्री, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष यांची मुंबई बँकेत बैठक झाली आणि दीड हजार कोटी रूपये मुंबईत स्वयंपुनर्विकासासाठी त्यांनी देण्याचे मान्य केलेय. त्यावरही भागणार नसून नुकतेच देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची मुंबईत आले असता भेट घेतली. त्यांना ही योजना समजावून सांगितली. त्यांनी पुढील पंधरवड्यात मला दिल्लीला बोलावले आहे. तसेच सहकार महामंडळही स्वयंपुनर्विकासासाठी आपल्याला एक हजार कोटी देणार असल्याचेही दरेकर यांनी म्हटले.

आ. दरेकर पुढे म्हणाले कि, आज सरकार आपल्या बाजूने आहे. केवळ मराठी माणसाचे भले बोलून होत नाही. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी ते खरोखर होत होते. आज मुंबईतील मराठी माणूस पालघर, वसई, विरार अगदी कसाऱ्यापर्यंत गेलाय. कारण मुंबईत परवडणारे घर त्याला मिळत नाही. अशा प्रकारच्या संकल्पना पुढे आल्या तर विकासक जो कमावणारा नफा असतो तो सोसायटीला मिळेल. अशा व्यापक विचाराने स्वयंपुनर्विकासाचे अभियान सुरू केले आहे.

तसेच ज्यावेळी ही संकल्पना आणली गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. त्या परिषदेत स्वयंपुनर्विकासाच्या जवळपास १८ मागण्या दिल्या होत्या त्यातील १६ अध्यादेश देवेंद्र फडणवीसांनी काढून आपल्याला दिलासा दिलाय. अजून काही अडचणीचे विषय आहेत ते चर्चेला घेऊ. गोराई परिसरात स्वयंपुनर्विकासाला खूप वाव आहे. स्वयंपुनर्विकासाला जेवढी मदत लागेल तेवढी उभी करू सरकार आपल्या पाठीशी आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला राजाश्रय दिला असून तुमचा प्रकल्प लवकर सुरू होऊन पूर्ण व्हावा, अशी अपेक्षाही दरेकरांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *