भारतीय संविधानाने महिलांना सन्मान दिला- सौ. सुनीता मोरे
![]()
भारतीय संविधानाने महिलांना सन्मान दिला- सौ. सुनीता मोरे
अमळनेर प्रतिनिधी- पूर्वीच्या काळी चूल आणि मूल या चौकटीत कैद असलेल्या महिलांना संविधानाने सन्मान दिला. संविधानामुळेच महिलांना शिक्षण घेणे घराबाहेर पडणे ,नोकरी करणे शक्य झाले .म्हणूनच आज विविध क्षेत्रात महिलांना मोठी संधी मिळाली असून अनेक जबाबदाऱ्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत त्या सांभाळत आहेत. हे केवळ संविधानामुळे शक्य झाले असे प्रतिपादन वक्ते सौ सूनिता मोरे यांनी केले. युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय आयोजित व्याख्यानात भारताचे संविधान या विषयावर त्या बोलत होत्या. भारतीय संविधानाबद्दल ची माहिती त्यांनी आपल्या खास शैलीत आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितली कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब के.डी पाटील, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

