व्हॉईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे  देशातील नंबर वन पत्रकार संघटनेची अमळनेर तालुका व शहर कार्यकारणी घोषित
1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे देशातील नंबर वन पत्रकार संघटनेची अमळनेर तालुका व शहर कार्यकारणी घोषित

Loading

 

“व्हॉईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे

देशातील नंबर वन पत्रकार संघटनेची अमळनेर तालुका व शहर कार्यकारणी घोषित

अमळनेर प्रतिनिधी

– देशातील नंबर वन असलेली पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडिया च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी तालुका व शहर कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली.

अमळनेर शहरातील पवित्र धार्मिक स्थान असलेल्या मंगळ ग्रह मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉइस ऑफ मीडिया चे प्रदेश सरचिटणीस तथा जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, साप्ताहिक विंग चे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांच्या उपस्थितीत अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे यांची सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली. सदर निवड घोषित करुन नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवीन तालुका कार्यकारणी गठित करणे, सभासदांच्या परिवाराची वैद्यकीय चाचणी शिबिराचे आयोजन करणे, सभासदांच्या मुलांच्या शिक्षणाला गरजे नुसार मदतीचा हात पुढे करण्यावर विचार विनिमय करने आदी बाबतीत बैठकीत चर्चा करण्यात आली.

तालुका कार्यकारणी

तालुकाध्यक्ष- उमेश काटे, उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, सचिव जितेंद्र पाटील, सहसचिव-ईश्वर महाजन, कोषाध्यक्ष रविंद्र मोरे, प्रसिध्दी प्रमुख- दिनेश पालवे, सल्लागार – धनंजय सोनार, मिलिंद पाटील, सदस्य – विनोद कदम, रवींद्र बोरसे, कमलेश वानखेडे, भाऊसाहेब देशमुख, निरंजन पेंढारे, जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील.

शहर कार्यकारणी

शहराध्यक्ष जयंतलाल वानखेडे, उपाध्यक्ष- बापूराव ठाकरे, सचिव- दयाराम पाटील, सहसचिव- सुकदेव ठाकुर, कोषाध्यक्ष रजनीकांत पाटील, प्रसिद्धीप्रमुख- राहुल पाटील, सल्लागार- विवेक पाटील, सदस्य-उमाकांत ठाकूर, मधुसुदन विसावे, शरद कुलकर्णी, दिनेश नाईक, बी एल पाटील, संजय पाटील, प्रसाद जोशी आदीचा समावेश आहे.

नूतन तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष यांच्या सह नूतन पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ पत्रकार भरत पाटील, किरण चव्हाण, प्रकाश जैन, रमण भदाणे, दत्तात्रय पवार, भूषण महाले, अमित ललवाणी, सोपान भवरे, विशाल मैराळे आदीं सह सर्व स्तरातून व नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *