कबचौ उमवि जळगावी संपन्न , कविसंमेलनात सर्वकाल चे प्रकाशन
1 min read

कबचौ उमवि जळगावी संपन्न , कविसंमेलनात सर्वकाल चे प्रकाशन

Loading

कबचौ उमवि जळगावी संपन्न ,
कविसंमेलनात सर्वकाल चे प्रकाशन

अमळनेर प्रतिनिधी
आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे प्रा.डाॅ.म.सु.पगारे
संचालक,भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे मराठी कविसंमेलनाचे आयोजन संपन्न झाले. कविसंमेलनाच्या आधीचे प्रथम सत्रात मराठी भाषेतील मान्यवर कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या *सर्वकाल* या प्राईम बुक्स-पब्लिशिंग हाऊस जळगावचे प्रकाशक श्री.प्रदीप पाटील यांनी प्रकशित केलेल्या एकोणिसाव्या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. डाॅ. म.सु.पगारे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना पगारे सर म्हणालेत की,कवी हिंगोणेकर मराठी साहित्य प्रातांत कवितेच्या क्षेत्रात स्वतःच्या कवितेला अधोरेखित करून सातत्याने सामाजिक जाणिवेची चिंतनशील दर्जेदार लक्षवेधी कविता लिहीत आहेत. हिंगोणेकर हे आयुष्यभर कविता लिहून स्वतःच एक कविता झालेले आहेत.यापुढेही ते मानवतावादी कविता अखंड लिहीतीलच अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी संपन्न झालेल्या चिंतनशील कवी संमेलनात सर्वश्री माया धुप्पड,शशिकांत हिंगोणेकर, प्रभाकर शेळके,डाॅ.अक्षय घोरपडे,संतोष साळवे आणि संतोष पावरा यांनी सामाजिक, राजकीय, मानवी मुल्य संवर्धनाच्या कविता सादर करून काव्य रसिकांना आत्मजाणीवेच्या चिंतनात डुंबवून ठेवले. कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ .म.सु.पगारे यांनी आंबेडकरवाद आणि बुद्धिझम तत्त्वाचे प्रकट करणा-या चिंतनशील कविता ऐकवून रसिकांना देशाभिमान आणि संविधानाचे बलस्थान बिंबवणा-या चिंतनशील जाणिवेच्या विचार प्रातांत वर्तमानाची चिंता आणि चिंतनशील विचारांची पेरणीच केली.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. दीपक खरात यांनी समुचितपणे केले तर विश्लेषणपर आभारप्रदर्शन डाॅ. सुदर्शन भवरे यांनी केले. याप्रसंगी श्रीमती डाॅ. सोनी,श्रीमती डाॅ. निळे,श्रीमती घोरपडे आणि भाषा विषयांचे सर्व अध्यानार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *